logo

मा.जिल्हाधिकारी नंदुरबार यांना श्री.संदीपदादा वळवी यांनी दिले आमंत्रण...

आज मा.मिताली शेटी जिल्हाधिकारी नंदुरबार* यांना सातपुडयातील रानमेवा सिताफळ भेट देऊन सुर्यदर्शन सातपुडा सिताफळ प्रक्रिया उद्योग केंद्र कात्री, हरित महाराष्ट्र बांबू लागवड याविषयी माहिती देताना सरपंच श्री.संदीपदादा वळवी
------------------------------------------------
उदेसिंग पाडवी
Social Media Activist
नंदुरबार महाराष्ट्र (MH)
------------------------------------------------
सिताफळ प्रक्रिया उद्योगाला भेट देण्याबाबत मा.जिल्हाधिकारी नंदुरबार यांना श्री.संदीपदादा वळवी यांनी निमंत्रण दिले...
मा.जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन देताना संदिप दादा म्हणाले की...
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील दुर्गम असलेल्या कात्री परिसरात मोठ्या प्रमाणावर सिताफळाची नैसर्गिक लागवड आहे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर सिताफळ या परिसरात उपलब्ध होतात परंतु या सिताफळची विक्रीची मोठी समस्या आहे हे लक्षात घेऊन आम्ही सुर्यदर्शन शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून सूर्यदर्शन सातपुडा सिताफळ प्रक्रिया उद्योगाची सुरुवात केलेली आहे.यासाठी आम्हाला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी तसेच डॉक्टर हेडगेवार सेवा समिती कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार यांचे तांत्रिक सहकार्य लाभत आहे.तरी या सिताफळ प्रक्रिया उद्योगाला कात्री येथे आपण भेट देऊन आम्हाला मार्गदर्शन करावे अशी विनंती केली.
यावर मा.जिल्हाधिकारी मॅडम यांनी येत्या तीन-चार दिवसात मी नक्कीच कात्री येथे भेट देऊ असे आश्वासन दिले...!

152
10137 views