ग्रामपंचायत दहेगाव तहसील कळमेश्वर च्या हद्दीत नरेगा अंतर्गत लावण्यात आलेल्या झाडांकडे ग्राम पंचायत चे दुर्लक्ष
ग्रामपंचायत दहेगाव तहसील कळमेश्वर अंतर्गत नदीकाठावरील शासकीय जागेत मनरेगा अंतर्गत झाडांची लागवड झाली ज्याची जिओ टॅगींग सुध्दा झाले. त्याच जागेला लागून असलेल्या पांधन चे काम मुसळे कन्स्ट्रक्शन ला मिळालेले असून तेथील जेसीबी ने तेथील 8 ते 10 झाडे तोडली. याची माहिती ग्राम रोजगार सेवक नी ग्राम पंचायत ला दिली. माहिती देऊन सुद्धा ग्राम पंचायत दहेगाव सचिव यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
कळमेश्वर तालुका प्रतिनिधी
सुमित गमे