महत्त्वाची सूचना कोळी महादेव , मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी इत्यादी जमातींना अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र दे
महत्त्वाची सूचना कोळी महादेव , मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी इत्यादी जमातींना अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र देताना महसुली विभागाचे प्रांत अधिकारी हे सातत्याने 1950 च्या पूर्वीचा पुरावा म्हणजे जातीची नोंद असलेलाच पुरावा मागून प्रकरण नाकारतात आदिवासी विकास विभागाच्या वतीने जाणुन बुजुन भ्रम निर्माण करून त्यांच्या डोक्यात हे भरवण्यात आलेले होते परंतु काल 8ऑक्टोबर 24 रोजी आदिवासी विकास विभागाने खुद्द याबाबत सर्व महसूल विभागीय आयुक्त सर्व जिल्हाधिकारी सर्व प्रांत अधिकारी यांना स्पष्ट असे निर्देश दिलेले आहेत की 1950 च्या पुरावा म्हणजे काय 1950 चा रहिवासी पुरावा म्हणजेच तो त्या ठिकाणी म्हणजेच काय तर 1950 ला अनुसूचित जमातीची यादी माननीय राष्ट्रपतींनी प्रसिद्ध केली त्या यादीच्या अगोदर तो व्यक्ती किंवा त्या व्यक्तीचे कुटुंब त्या गावात त्या ठिकाणी वास्तव्यास असल्याबाबतचा पुरावा म्हणजेच रहिवासी पुरावा असल्याबाबतचे आदिवासी विकास विभागाने काल पञकामध्ये नमुद केले आहे तर आता बांधवांनो आता आपली जबाबदारी आहे की प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक समाज बांधवांनी एक तज्ञ मंडळींचे एक टीम बनवून चर्चा करुन एक निवेदन व कालच्या पत्राची एक प्रत निवेदना सोबत जोडून जात प्रमाणपत्र देण्यात प्रांत अधिकारी जे 1950 च्या पूर्वीच्या जातीची नोंद असलेला पुरावा मागून प्रमाणपत्र नाकारतात ते तात्काळ थांबवून कालच्या परिपत्रकानुसार 1950 चा पुरावा म्हणजे रहिवासी पुरावा बाबत मंत्रालय स्तरावरून पत्र काढण्यात आले आहे त्या पत्राला अनुसरून आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व प्रांत सर्व अधिकाऱ्यांना आपण याबाबत निर्देश देण्याचे विनंती करावी विभागीय आयुक्त यांना भेटून जिल्हाधिकारी यांना भेटून योग्य मांंडणी करून कुठलाही वादविवाद न करता कालच्या पत्राला अनुसरून प्रांत अधिकाऱ्यांना वरील पत्राच्या अनुषंगाने निर्देशाचे पत्र काढण्याकरता सर्वांनी तात्काळ कामाला लागावे विभागीय आयुक्त महसूल यांच्या डोक्यात १९५० चा पुरावा म्हणजे रहिवासी पुरावा हे भरवण्यात यशस्वी झालो तर महसूल विभागातील आपला 1950 च्या पुरावा बाबतचा आपली अडचण कायमची दूर होणार आहेतरी सर्व बांधवांनी योग्य पद्धतीने अतिशय शांतपणे मुद्देसूद आपापले विभागातील विभागीय आयुक्त महसूल व जिल्हाधिकारी यांना भेटून संबंधित पत्रानुसार पत्र काढण्याची मागणी करावीनियम 2003 मधील तरतुदीमध्ये तसेच काल प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये सुद्धा 1950 च्या पूर्वीचा पुरावा म्हणजेच जातीची नोंद असलेला पुरावाच पाहिजे असा कुठलाही उल्लेख या पत्रामध्ये केलेला नाही याचा अर्थ सरळ आहे की 1950 चा पुरावा म्हणजेच रहिवासी पुरावा लवकरच निवेदनाची एक प्रत ग्रुप वर टाकण्यात येणार आहेसुचना........ कोणीही आपल्या मर्जीप्रमाणे एकटे एकट्याने sdo सोबत चर्चा करण्याकरता जाऊ नये व अधिकाऱ्यांसोबत वादविवाद करू नये तर प्रत्येक जिल्ह्यातील जेवढे काही आपल्या समाजातील अभ्यासक आहेत ज्यांना या विषयांमध्ये काही बाबी कळतात आहे अशा लोकांची तात्काळ आप आपल्या जिल्ह्यात सर्व कार्यकर्त्यांची एक छोटी बैठक घेऊन चर्चा करून सर्व मंडळींनी याबाबत चर्चा करावी व नंतरच संबंधित विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी sdo यांच्या सोबत चर्चा करण्याकरता नियोजन करावेधन्यवाद आपलाच प्रशांत तराळेआदिवासी कोळी महासंघ आदिवासी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्यMob no. 9767625193