logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

भरधाव दुचाकी बंद पडलेल्या एसटी बसवर !धडकली; तिघे तरूण जागीच ! ठार ..


(आयमा न्युज बुलडाणा वसीम शेख )

मेहकर चिखली रोडवरील वर्दडा फाट्यावरील भीषण अपघात साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत वर्दडा फाट्यावर चिखली आगाराची बस ही बंद पडलेली असताना त्या बसवर भरधाव असलेली दुचाकी ही पाठीमागून येऊन धडकली, त्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अंधारात ही बस दिसून न आल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. तर .लव्हाळा चौकीपासून एक किलोमीटर अंतरावर वर्दडा फाटा असून, तेथे चिखली आगाराची बस क्रमांक एमएच ०६ एस ८८१६ ही बस आज, दि. ८ ऑक्टोबररोजी दुपारी बंद पडली होती. त्या बसचे दुरुस्तीचे काम कर्मचारी करीत होते. रात्री ७३० वाजता लव्हाळा येथून गोपाल पंढरी सुरडकर (वय २१) रा. बेराळा, धनंजय परमेर्श्वर ढंग (वय २५) रा. वाघापूर, आणि सुनील सुभाष सोनुने, रा. चिखली (खडक पुरा) चिखलीकडे चालले होते. त्यांची मोटारसायकल (एमएच २८बी एल०८४६ ) उभ्या असलेल्या एसटी बसवर येऊन धडकली. मोटारसायकलचा वेग एवढा होता की, तिघेही जागीच ठार झाले. या घटनेची माहिती साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड यांना कळताच, ते घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह चिखली ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे...

837
30627 views

Comment