logo

केदारेश्वर प्रतिष्ठान पुणे आणि साईरंग फाऊंडेशनद्वारे दांडीयाचे यशस्वी आयोजन



पुणे: दरवर्षीप्रमाणे केदारेश्वर प्रतिष्ठान पुणे (चिखली मोशी गुजर मित्र परिवार) आणि साईरंग फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३ दिवसीय डांडिया (गरबा) कार्यक्रमाला पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील सर्व लेवा पाटीदार गुजर समाज बंधू-भगिनी आणि तरुण मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या सहा वर्षांपासून बोऱ्हाडे वाडी, मोशी येथे चिखली मोशी गुजर मित्र परिवाराच्या माध्यमातून आणि श्री ज्ञानेश्वर भाऊ बोऱ्हाडे व पुजाताई बोऱ्हाडे यांच्या सहकार्याने या नवरात्र डांडियाचे आयोजन केले जात आहे.

नेहमीप्रमाणे, या वर्षीही विविध राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुण्यांमध्ये पिंपरी-चिंचवड शहराचे माजी महापौर श्री राहूल दादा जाधव, स्थायी समिती माजी अध्यक्ष श्री अजित भाऊ गव्हाणे, माजी नगरसेविका सौ अश्विनी जाधव, श्री संतोष तात्या जाधव, भाजपा महिला उपाध्यक्ष सौ सोनम जांभूळकर, भाजपा युवा मोर्चाचे चिटणीस रविशेठ जांभूळकर, राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहर अध्यक्षा सौ कविता अल्हाट, भाजपा युवा नेते श्री निखिल भाऊ बोऱ्हाडे, श्री निलेश बोराटे, राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते श्री सागर बोराटे, तसेच उद्योगपती श्री रविंद्र यशवंत चौधरी यांचा समावेश होता.

कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी भूपेंद्र पटेल, शैलेंद्र पाटील, योगेश पाटील, सुहास पाटील, संजय चौधरी, राहुल पाटील, युवराज पाटील, हितांशु पाटील, धर्मेश पाटील, रामचंद्र पाटील, नितीन पाटील, रोशन पाटील, निलेश पाटील, हितेंद्र पाटील, जगदीश चौधरी, चंद्रकांत पाटील, कन्हैयालाल पाटील, घनश्याम पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात केदारेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री डायाभाई, कार्याध्यक्ष श्री मोहनभाई, मा.अध्यक्ष प्रकाशभाई यांच्यासह ईतर सर्व समाज बांधवांनी मोलाचे योगदान दिले.

106
3889 views