logo

*केडीपी कराओके सिंगिंग कॉम्पिटिशन सिझन 3 चे मानकरी ठरले, असिस्टंट कमिशनर पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन.... डॉ बिपिनभाई रतिलाल पाटील, मुळगाव जावदे त.हवेली ह मु पुणे


केदारेश्वर प्रतिष्ठान, पुणे द्वारा आयोजित करण्यात आलेल्या लेवा पाटीदार गुजर समाजातील गायक-गायिकांसाठी आयोजित सिंगिंग कॉम्पिटिशन सीजन 3 नुकतेच यशस्वीरित्या संपन्न झाले. या स्पर्धेचे आयोजन निळू फुले नाट्यगृह, सांगवी, पुणे येथे करण्यात आले होते, ज्यात गुजरात आणि महाराष्ट्रातील 26 स्पर्धकांनी सहभाग घेतला.
परीक्षकांनी दिलेल्या निकालानुसार, टॉप टेन स्पर्धक निवडले गेले, त्यानंतर टॉप फाईव्ह आणि शेवटी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे विजेते घोषित करण्यात आले.
टॉप टेनमध्ये सहभागी झालेले स्पर्धक होते:
श्री भरतभाई पुरुषोत्तम पाटील
श्री प्रकाशभाई (मुकेश) फकीरा पाटील ,
श्री राकेशभाई मोहन चौधरी,
श्री जयेशभाई चुनिलाल पटेल ,
श्री हिरालालभाई श्यामराव पा.,
सौ संगीता प्रदीप पाटील ,
सौ स्मिता विनोद पाटील
श्री अमित काशिनाथ पटेल
डॉ बिपिन पाटील (पुणे)
श्री अतुलभाई जिवन पटेल
या स्पर्धेत डॉ. बिपिनभाई रतिलाल पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला, उपविजेता श्री अमितभाई काशिनाथ पटेल ठरले, आणि तिसरा क्रमांक सौ स्मिता बेन विनोद पाटील यांनी मिळवला. चौथ्या क्रमांकावर श्री हिरालालभाई पाटील आले, तर पाचवा क्रमांक श्री प्रकाशभाई फकीरा पाटील यांनी मिळवला.
या स्पर्धेत सहभागी झालेले कलाकार होते,
श्री कैलासभाई उमाकांत पटेल.
सौ निकिताबेन प्रतिक पाटील
प्रा.आर एस पाटील
श्री मधुकर सोमजी पाटील
सौ संगीताबेन प्रदीप पाटील
श्री अमितभाई काशिनाथ पटेल,
श्री पृथ्वीराज चंद्रहास पाटील,
श्री महेंद्रभाई वसंत पाटील,
सौ संगीताबेन विजय पाटील
श्री जयेशभाई चुनिलाल पटेल
श्री गणेशभाई एस चौधरी
श्री प्रकाशभाई(मुकेश) फकीरा पाटील,
डॉ. बिपिनकुमार आर. पाटील,
सौ स्मिताबेन विनोद पाटील,
श्री राकेशभाई मोहन चौधरी
श्री लिंबाभाई हिरालाल पटेल,
श्रीअतुलभाई जे. पटेल
श्री भरतभाई पुरूषोत्तम पाटील
श्री शरदभाई गोविंद पाटील
श्री पंकजभाई नरसई चौधरी
श्री हिरालाल श्यामराव पाटील
श्री घनश्यामभाई रोहिदास पाटील,
श्री योगेशभाई राजेंद्र पाटील,
श्री अरुणभाई गोपाळ पटेल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष श्री डायाभाई पटेल यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उद्योजिका सौ अलकाताई रवींद्र पाटील श्री आर वाय पाटील उद्योजक श्री अशोक भाई संभू पटेल श्री अमितभाई पटेल,सौ हेमलता पाटील, कार्याध्यक्ष मोहनभाई पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी सगळ्यांनी महिला सक्षमीकरणावर भर दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजयभाई अशोक पाटील डॉ अंबालालभाई पाटील श्री अमित भाई पटेल आणि सौ स्मिता विनोद पाटील, डॉ प्रशांत पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव श्री गिरधरभाई पाटील यांनी केले.
केडीपी कराओके सिंगिंग कॉम्पिटिशन सीजन 3 साठी, सौ मीरा भावे मॅडम, काजल चौबे मॅडम तसेच संगीतकार श्री सचिन जी अवघडे यांनी काम पाहिले.
यावेळी सिने अभिनेता नितीन भाई पाटील व त्यांचे सुपुत्र नील पाटील यांचा "सूर्या एक प्रेरणादायी प्रवास" हा कान्स चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट चित्रपट म्हणून पुरस्कृत झाल्याबद्दल तसेच नितीन भाई पाटील यांना देखील उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी श्री आर वाय पाटील यांना हावर्ड विद्यापीठातून पदवी प्राप्त केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या तांत्रिक बाबी प्रा. योगेश पाटील सर, अनुराग पाटील, लकेश पाटील, सहयोग पाटील, हिमांशू पाटील, स्नेहलभाई चौधरी ,मनोज भाई चौधरी आणि नितीनभाई पटेल यांनी सांभाळली.
भोजन व्यवस्था डॉ नितीन भाई पाटील, श्री रिंकूभाई पाटील, श्री प्रकाशभाई चौधरी यांनी पाहिली तर छायाचित्रण श्री रतिलालमामा पाटील , अनिल भाई पाटील,यांनी केले.
कार्यक्रमाला उद्योजिका सौ अलकाताई रवींद्र यशवंत पाटील सुयश ग्रुप ऑफ कंपनीज पुणे, उद्योजक श्री अशोक भाई संभू पटेल संजोग पाँलीमर्स, श्री अमितभाई काशिनाथ पटेल युजेस पावरमँक्स, उद्योजक श्री योगेशभाई पाटील एटुझेड मसाले,सौ रोहिणीबेन पाटील देवराई गृहउद्योग, अभिनेता नितीनभाई पाटील संस्थापक अब्राटेक काँर्पोरेशन ,एमसीएमए अकँडमी,मनोजभाई चौधरी,ऊज्वलभाई पाटील अकँडमी,कँटँलीस्ट अकँडमी श्री संजयभाई पाटील,आदींचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्येष्ठ श्री नरसई देविदास चौधरी, *मुळगाव वाके व सौ राधाबाई नरसई चौधरी यांनी याप्रसंगी आक्का एज्युकेशन फंडला 25 हजार रुपयाची देणगी प्रदान केली. तसेच त्यांच्या सुपुत्री आणि सहभागी गायिका सौ संगीताबेन प्रदीप पाटील यांनी देखील त्यांना प्राप्त झालेली राशी प्रतिष्ठानला सुपूर्द केली* याबरोबरच टॉप फाईव्ह मध्ये आलेले *श्री अमित भाई काशिनाथ पटेल आणि श्री अतुलभाई जिवन पटेल* यांनी देखील त्यांना प्राप्त झालेली सहयोग राशीत अधिकची देणगी टाकून प्रतिष्ठानला सहयोग म्हणून प्रदान केली.
मंच व्यवस्थापनासाठी
श्री योगेशभाई घोकडे,
श्री पि.यू पाटील,
श्री जगदीशभाई,
श्री प्रकाशभाई चौधरी,
श्री विजय भाई पाटील ,
श्री विलासभाई पाटील,
श्री मोहनभाई पटेल,
श्री अनिलभाई पाटील,
श्री नितीन भाई पटेल
श्री गिरधरभाई पाटील आणि श्री मोतीलालभाई पाटील आदींचे सहकार्य लाभले.
कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी केदारेश्वर प्रतिष्ठान चे सर्व कार्यकारणी मंडळ व पदाधिकारी तसेच जीसीसीए पुणे चाप्टर चे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

69
2022 views