निसार बागवान एमआयएम शहराध्यक्षांच्या पाठपुराव्याला यश..!
तोहित पटेल
पचोड प्रतिनिधि.
पैठण शहरातील सादात मोहल्ला येथील रहिवासी खालेद जावेद आंबेकर या नागरिकास 2022 पासुन त्याच्या हक्काचे राशन न देता शहरातील राशन दुकान क्रमांक 01 चे दुकानदाराने पिवळे रेशन कार्ड रद्द करून त्याऐवजी एका शासकीय कर्मचाऱ्याचे नाव टाकले. यासंदर्भात निसार बागवान यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. संबंधित अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत यावर कारवाई करत खालेद जावेद आंबेकर यांना संपूर्ण आठ क्विंटल धान्य देऊ केले व त्यांचे नावही पुन्हा पिवळ्या राशन कार्ड धारक यादीत घेण्यात आले. याचे सर्व श्रेय खालेद जावेद आंबेकर यांनी एमआयएम शहराध्यक्ष निसार बागवान यांना दिले.