
चाळीसगांव येथे लोखंडवाला काँप्लेक्स ग्रुप तर्फे नवरात्र उत्सव मोठ्या थाटामाटात सुरू…
चाळीसगांव येथील लोखंडवाला काँप्लेक्स ग्रुप व नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने शारदीय व आश्विन नवरात्र उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यावर्षी १४ फूट उंच आई दुर्गा देवीची राम-लक्ष्मण व हनुमान यांच्या सह सुंदर व रेखीव अशा मूर्तीची स्थापना केली आहे.
मंडळात गणेशोत्सवासह नवरात्रोत्सवही तेवढ्याच उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे.
चाळीसगावातील लोखंडवाला काँप्लेक्स ग्रुप नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने शारदीय व आश्विन नवरात्रोत्सवानिमित्त या काळात मोठ्या भक्तिभावाने देवीची मूर्तीची स्थापना केली जाते. सांस्कृतिक, धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवत असलेल्या लोखंडवाला काँप्लेक्स ग्रुप तर्फे २००० सालापासून नवरात्रोत्सवात देवीची स्थापना करून आकर्षक सजावट व रोषणाई करण्यात येते. गेल्या २४ वर्षांपासून मंडळाने ही उत्सवाची परंपरा कायम ठेवली आहे. घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत सलग १० दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
नवरात्रोत्सवात रोज रात्री आठ वाजेपासून आबालवृद्ध व महिला मोठ्या उत्साहाने पारंपरिक वेशभूषेत दांडिया व गरबा खेळायला येतात. शहर व ग्रामीण परिसरातील महिलाही सहभागी होतात.महिलांसाठी खास स्पर्धा राबविण्यात येतात जसे संगीतखुर्ची , रांगोळी स्पर्धा तसेच अनेक उपक्रम देखील लोखंडवाला काँप्लेक्स ग्रुप तर्फे राबवले जातात. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मंडळात महिला व मुलींची खूप गर्दी बघायला मिळते, सुरक्षेला गालबोट लागणार नाही यासाठी मंडळाचे कार्यकर्ते सुद्धा तत्पर असतात.
मंडळाचे अध्यक्ष हे चाळीसगांव येथील जेष्ठ पत्रकार , चाळीसगांव समाचार चे संपादक व आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कूल येथील शिक्षक श्री.रमेश जानराव सर हे आहेत. उपाध्यक्ष श्री.आनंदा छगन गवळी हे सुद्धा जेष्ठ नागरिक असून ते गवळी समाजाचे पंच आहेत. सचिव श्री.श्याम (अण्णा) नारायण गवळी हे टाकळी प्र.चा. येथील ग्रामपंचायत सदस्य आहेत तसेच ते भारतीय जनता पार्टीचे सुद्धा निष्टावंत कार्यकर्ते आहेत.
महत्त्वाचे म्हणजे चाळीसगांवचे डॅशिंग आमदार व वारकरी पुत्र मा.श्री.मंगेश रमेश चव्हाण यांच्या संकल्पनेने हे कार्यक्रम राबवले जात आहेत…