logo

विरांगणा राणी दुर्गावती ५०१ वी जयंती साजरी

विरांगणा राणी दुर्गावती जनजाती सामाजिक संस्था नागपूर दि.०५/१०/२०२४ रोजी शनिवारला यांच्या वतीने आयोजित माहेश्वरी भवन नागपूर येथे राणी दुर्गावती यांच्या 501 वा (पंच शताब्दी) जयंती सोहळा मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांचे 14 वे वंशज मा श्री वीरेंद्रजी शहा अध्यक्ष म्हणून तर प्रमुख वक्ते म्हणून मा श्री विनायकजी देशपांडे दिल्ली तथा श्री सुनीलजी किटकुरु नागपुर प्रामुख्याने उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते श्री गोविंद जी शेंडे,श्री गोल्डीजी तुली,श्री प्रशांतजी तितरे नागपुर तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री विनोदजी मसराम तथा जनजातीय गटनेते तसेच जनजातीय परिवारातून साडेतीनशे च्या वर समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय श्री संतोष आत्राम यांनी तर आभार प्रदर्शन श्री प्रशांत मडावी यांनी मानले.

85
2854 views