logo

रसायनशास्त्र विषय जीवन घडविणारा:- प्रा. निलेश पडोळे

श्री शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ द्वारा संलग्नित वरुड येथील महात्मा फुले कला, वाणिज्य व सितारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाद्वारे नुकतेच रसायनशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. सदर उद्घाटन प्रसंगी विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर येथील प्रा. निलेश पडोळे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा.आर.पी. गणोरकर यांनी विभागातर्फे आयोजित होत असलेल्या विद्यार्थी केंद्रित कार्यक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना देत सदर अभ्यास मंडळाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. सदर अभ्यास मंडळाची अध्यक्ष कु. स्नेहल हेटे हिने रसायनशास्त्र विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सत्र २०२३-२४ च्या वार्षिक अहवालाचे वाचन केले. तदनंतर उद्घाटक व प्रमुख वक्ते प्रा. निलेश पडोळे यांनी विद्यार्थ्यांना रसायनशास्त्र विषयाचे महत्त्व पटवून देत आपल्यामध्ये एखाद्या विषयाबद्दल जिद्द व चिकाटी असेल तर एखादा विषय कसे आपले जीवन परिवर्तित करतो हे समजून सांगितले तसेच, मी या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असून आज रसायनशास्त्र विभागाचा तसेच महाविद्यालयाचा होत असलेला विकास पाहून मला या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्याचा सार्थ अभिमान आहे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. दि. वि. हांडे यांनी रसायनशास्त्र विभागातर्फे घेण्यात आलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचे अभिनंदन करीत रसायनशास्त्र विषयासोबत जर तुमची पदवी असेल तर तुम्हाला विविध क्षेत्रात नोकरीच्या कशा संधी उपलब्ध होतात त्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमानंतर एम. एस. सी केमिस्ट्री व बी. एस. सी. च्या विद्यार्थ्यांकरिता प्रा. निलेश पडोळे यांचे स्पेक्ट्रोस्कोपी या विषयावर गेस्ट लेक्चर आयोजित करण्यात आले होते. त्या गेट लेक्चर मधून स्पेक्ट्रोस्कोपी या विषयाबद्दल विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे संचालक प्रा. ए. के. वंजारी तर आभार प्रा. एस. आर. कोलटेके यांनी मानले. सदर कार्यक्रमाला प्रा. पी.यू बेलसरे, प्रा. व्ही. एस. बावणे, प्रा. वाय. एस. तामगाडगे, प्रा. गिरीधर रेड्डी, प्रा. आर. वाय. बकाले, प्रा. आम्रपाली पाटील तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

45
8221 views