logo

जि.प.प्राथमिक केंद्र शाळा कात्री (पाटीलपाडा) वनभोजन सहल...

जि.प.शाळा कात्री (पाटीलपाडा) वनभोजन सहल...

उदेसिंग पाडवी
Social Media Activist
नंदुरबार महाराष्ट्र (MH)

आज दिनांक 5/10/ 2024 रोजी जि.प. प्राथमिक केंद्र शाळा कात्री येथे आनंददायी शनिवार उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना सुर्यदर्शन शेतकरी प्रोड्युसर कंपनी प्रा.लि.कात्री परिसरात भेट देण्यात आली.विद्यार्थ्यांना परिसरातील विविध वृक्षांची ओळख करून दिली. तसेच वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांना सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून रस्सीखेच, संगीत खुर्ची, आदिवासी टीमली नृत्य, गरबा नृत्य, गाणी असे विविध उपक्रम घेण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाची अभिरुची वाढीस मदत होईल. विद्यार्थ्यांचे संभाषण कौशल्य विकसित होणे. त्यांचा आत्मविश्वास वाढावा.या उद्देशाने असे विविध उपक्रम घेतले जातात.उपक्रमात कात्री केंद्राचे केंद्रप्रमुख श्री शंकर वसावे सर तसेच ग्रुप ग्रामपंचायत कात्री गावाचे सरपंच श्री.संदीप दादा वळवी यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक श्री.भाईदास पाटील सर सहशिक्षक श्री.अविनाश गावीत. युवा प्रशिक्षणार्थी श्रीम.शेवंती वळवी श्री.रूपसिंग वळवी. स्वयंपाकीण ताई,तसेच उदेसिंग पाडवी, दिपक पाडवी व ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

669
497 views