logo

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुनील रासने

अहिल्यादेवीनगर (प्रतिनिधी ) : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुनील रासने यांची एकमताने निवड करण्यात आली. शुक्रवारी झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.ही निवड दोन वर्षांसाठी आहे. तसेच माजी अध्यक्ष माणिक चव्हाण यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.विश्वस्त मंडळाच्या बैठकीला ट्रस्टचे माजी अध्यक्ष माणिक चव्हाण, माजी उपाध्यक्ष सुनील रासने, विद्यमान उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी,सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी आदी उपस्थित होते. बैठकीनंतर सर्व विश्वस्तांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली.मागील बैठकीतील निर्णयानुसार १४ वर्षांचे नियोजित अध्यक्ष सन २०२२-२४ यासाठी ट्रस्टच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण यांनी कार्यकाळ पूर्ण केला. आता सन २०२४-२६ अशा दोन वर्षांसाठी ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुनील रासने, सन २०२६-३१ या पुढील पाच वर्षांसाठी महेश सूर्यवंशी आणि सन २०३१ – ३६ या त्या पुढील पाच वर्षांसाठी हेमंत रासने हे ट्रस्टचे अध्यक्षपद भूषवणार आहेत.

1
1443 views