
मुला मुलींचे क्रॉस कंट्री स्पर्धा मोठ्या उत्साहात श्री रामचंद्र अभियांत्रिक महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते.
पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे डिस्ट्रिक्ट झोनल स्पोर्ट्स कमिटी व श्रीरामचंद्र अभियांत्रिक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने अंतर महाविद्यालय क्रॉस कंट्री स्पर्धे चे आयोजन शनिवारी केले गेले यामध्ये अनेक महाविद्यालयांच्या खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला क्रॉस कंट्री स्पर्धाची सुरुवात लोणीकंद मधील श्री रामचंद्र अभियांत्रिक महाविद्यालयाच्या मुख्य द्वारापासून सकाळी 7.00 वाजता महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्री मारुती भुमकर यांनी पांढरा झेंडा दाखवून रेसला सुरुवात केली सहभागी खेळाडूंनी श्री रामचंद्र अभियांत्रिक महाविद्यालयापासून ते बकोरी गावापर्यंत व पुन्हा महाविद्यालयाच्या मुख्य द्वारा जवळ परत येऊन शर्यत संपवली या क्रॉस कंट्री स्पर्धेचे आयोजनाचे नेतृत्व डॉ. सुषमा तायडे (नॅशनल खेळाडू )क्रीडा संचालिका यांनी केले प्रतियोगिता समाप्तीनंतर पारितोषिक वितरणाचे कार्यक्रम महाविद्यालयात आयोजन करण्यात आले याप्रसंगी महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्री मारुती रामचंद्र भूमकर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले की खेळामध्ये जय पराजय होत असतो तो मोठ्या मनाने स्वीकारला पाहिजे व जे पराजित झाले त्यांनी पुन्हा नव्या मोठ्या जोमाने सुरुवात केली पाहिजे आपल्या देशाची लोकसंख्या १५०कोटीच्या आसपास आहे आपण जर विचार केला तर खेळामध्ये सुवर्णपदक आणू शकतो त्यासाठी मेहनत घेणे महत्त्वाचे आहे व सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या सदस्यांना त्यांनी आश्वासन दिले आम्ही महाविद्यालयात अनेक खेळाचे आयोजन करू व त्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे त्यानंतर डॉ. सुषमा तायडे यांनी पारितोषिक वितरणाच्या समारंभाचे प्रस्तावना करताना खेळाडूंना मार्गदर्शन केले व म्हणाले की प्रत्येक खेळाडूंनी देशाला क्रीडा क्षेत्रात उंच ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे व त्यांनी व्यासपीठावर असणाऱ्या अनेक मान्यवरांचे आभार मानले पारितोषिक वितरण समारंभामध्ये अनेक मान्यवरांनी थोडक्यामध्ये उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले या क्रॉस कंट्री रेस मध्ये मुलांच्या गटामध्ये तीन प्रथम क्रमांक निवडण्यात आले तसेच मुलींच्या गटामध्ये पण तीन क्रमांक देऊन खेळाडूंना सन्मानचिन्ह देण्यात आले या कार्यक्रमास बीजीएस महाविद्यालयाचे प्राचार्य गायकवाड सर श्रीरामचंद्र अभियांत्रिक महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश देसाई व क्रीडा सचिव तसेच अनेक महाविद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षकअसे अनेक जण कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली होदाडे यांनी केले व त्यांनी उपस्थित असणारा शिक्षक व शिक्षक तर कर्मचारी यांचे आभार मानले