नमस्ते शौर्य फाऊंडेशन तर्फे दिवाळी फराळ - सैनिकांसाठी
*नमस्ते शौर्य फाऊंडेशन तर्फे दिवाळी फराळ - सैनिकांसाठी*
वर्ष ६ वे
दिवाळी दीपावली हा आपला सर्वात मोठा सण आहे. दानवी संस्कृतीला मूठमाती देऊन मानवी संस्कृतीचा उत्सव दिव्यांच्या रोषणाईत साजरा केला जाणारा हा सण! श्रीकृष्णाने त्याच्या काळातला राक्षस मारला. आजच्या आधुनिक काळातला भारत मातेला उपद्रव देणारा राक्षस मारून आपल्या देशाचे संरक्षण करणाऱ्या वीर जवानांसमवेत शौर्याचा उत्सव साजरा करण्यासाठी मिळालेली ही संधी आपण सत्कारणी लावत आहोत ती *दिवाळी फराळ - सैनिकांसाठी* या उपक्रमाद्वारे!
आपण दिवाळी साजरी करण्यापूर्वीच आपल्या भारत मातेच्या वीर पुत्रांना सादर आणि स्नेहार्थ भावनेने, भारतीय जनतेच्या वतीने, दिवाळी फराळ सन्मानाने दरवर्षी देत आहोत. या संकल्पनेमागची राष्ट्रभक्तीची भावना व भारतीय सैन्यदलाबद्दलच्या कृतज्ञतेला देश बांधवांचा उदंड प्रतिसाद लाभत असल्यामुळेच हे कार्य आपण यशस्वीपणे अविरत करत आहोत याचा आपल्या सर्वांना आनंद, अभिमान आहे. आपल्या सर्वांचे सर्व प्रकारचे योगदान लाभत असल्यामुळे या उपक्रमाला कळत नकळत, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ज्यांचे सहकार्य लाभत आहे त्या ज्ञात अज्ञात बांधवांविषयी कृतज्ञता व्यक्त केल्यावाचून मनास चैन पडत नाही.
या वर्षी आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे ६००० भारत मातेच्या शूरवीर पुत्रांना, जे स्वतःच्या परिवारापासून, गणगोतांपासून दूर, भारतीय सीमेवर ऊन, वारा, पाऊस, हिमवर्षाव आणि तत्सम नैसर्गिक आपत्तींना तोंड देत, शत्रू कडून होणाऱ्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून राष्ट्ररक्षणार्थ जागता पहारा रात्रंदिवस देत आहेत, त्यांच्यामुळे आपण सण - उत्सव साजरे करू शकतो, आपले दैनंदिन जीवन सुरळीतपणे जगू शकतो अशा भारतीय सैनिकांना दिवाळी फराळाचे डबे पाठवणार आहोत.
एका दिवाळी फराळाच्या डब्यात... *चिवडा, शेव, चकल्या - 6 नग, पौष्टिक लाडू- 4 नग* असतील
या वर्षी, दिवाळी फराळाचे डबे - तेजपूर, तवांग, मेघालय, त्रिपुरा, श्रीनगर, लेह आणि सियाचेन.. या बॉर्डरवर तैनात असलेल्या भारतीय सैनिकांना आपल्या संस्थेच्या वतीने उपलब्ध करून देणार आहोत.
दसरा झाल्यावर, आमच्या संस्थेच्या वतीने फराळाचे डबे भरण्याचे काम केले जाते. आपणही त्यात सहभागी होऊ शकता.
या उपक्रमाला आपण पुढीलपैकी कोणत्याही प्रकारे सहाय्य करू शकता..... अभिनेता रत्नकांत
१) किमान ₹ 500/- आणि त्याच्या पटीत देणगी (यात, फराळ making charges, packing charges and Shipping charges समाविष्ट आहेत)
२) देणगिदाराच्या नावाचा sticker फराळाच्या बॉक्सवर लावण्यात येईल.
आपण स्वतः बनविलेली शुभेच्छा पत्रे सुद्धा सैनिकांना पाठविणार आहोत.
देणगी पाठविण्यासाठीचे डिटेल्स -
Namaste Shaurya Foundation
IDBI Bank
Branch - Dombivli East
Current A/c no. 0455102000024550.
IFSC - IBKL0000455
अथवा, पुढील नमस्ते शौर्य फाऊंडेशन चा QR Code वापरून सुद्धा आपण देणगी देऊ शकता.
देणगी पाठविल्यावर पुढील गोष्टींची पूर्तता करावी, म्हणजे ट्रॅक ठेवणे सोयीचे होईल, ही विनंती🙏🏻
Donor's details -
1. Name
2. Address
3. PAN No.
4. Whatsapp number
5. Email ID
6. Amount ₹
7. Transaction or UPI Ref Number
अधिक माहितीसाठी संपर्क:-
*NAMASTE SHAURYA FOUNDATION*
7208112484 | 9819504020