logo

शिवसेनेची महिला शक्ती शिंदखेडा मतदार संघात इतिहास घडवणार...आमदार निवडण्या साठी सज्ज व्हा _ शिवसेना उपनेत्या शितल देवरुख

शिवसेनेची महिला शक्ती शिंदखेडा मतदार संघात इतिहास घडवणार...आमदार निवडण्या साठी सज्ज व्हा _ शिवसेना उपनेत्या शितल देवरुखकर* *शिंदखेडा येथे शिवसेनेचा महिला संवाद अभियान*
शिंदखेडा ( प्रतिनिधी ):- येथील बिजासनी मंगल कार्यालय येथे महिला संवाद अभियान आयोजित करण्यात आले होते शिंदखेडा विधानसभा मतदार संघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांच्या मार्गदर्शना खाली संपन्न झाला हयाप्रंसगी शिवसेना उपनेत्या शितल देवरुखकर यांनी महिला शक्तीच शिंदखेडा मतदार संघाचा इतिहास बदलू शकते भाजपा चा बुरुजाला सुरंग लावण्यासाठी शिवसेना च सक्षम आहे केवळ पंधराशे ची लाडकी बहीण योजनेस बळी पडू नका हि अमिशाची योजना आहे... फक्त निवडणुकी पुरती ... निवडून आल्या नंतर हे विसरतील.....त्यासाठी बदल घडवून आणला तर महाविकास आघाडी सरकार बसेल... या मतदार संघाचा आमदार आपल्या विचाराचा दिला पाहिजे...त्यासाठी आम्ही शिंदखेडा मतदार संघ साठी आग्रही राहू असे शिवसेना उपनेत्या शितल देवरुपकर यांनी प्रतिपादन केले. सुरुवातीला महापुरुषांचे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. प्रास्तविक जिल्हाप्रमु़ख हेमंत साळुंखे यांनी केले हयाप्रंसगी व्यासपीठावर शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील महिला आघाडी निरिक्षक शुभदाताई शिंदे,नाशिक संपर्क प्रमुख रिता वाघ ,जिल्हा संघटीका ज्योती ताई पाटील, जि प सदस्य सुनिता सोनवणे ,उपजिल्हा संघटिका विजयाताई ठाकुर, तालुका संघटीका ज्योती बोरसे, पं स सदस्या रंजनाताई देसले, प्रीतिताई बेडसे,कु. मानसी पवार, धुळे महीला आघाडी जिल्हा संघटिका हेमाताई हेमाडे, धुळे महानगर प्रमूख डॉ.जयश्री वानखेडे सह शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे , उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, जिल्हा संघटक मंगेश पवार , माजी उपजिल्हाप्रमुख सर्जेराव पाटील , उपजिल्हा संघटक भाईदास पाटील, तालुकाप्रमुख गिरीश देसले , ईश्वर पाटील, तालुका संघटक डॉ. मनोज पाटील ,शिंदखेडा शहर प्रमुख संतोष देसले , विधानसभा क्षेत्र प्रमुख गणेश परदेशी , दोंडाईचा शहर प्रमुख शैलेश सोनार, माजी तालुकाप्रमुख विश्वनाथ पाटील, उपजिल्हा समन्वयक मनोज पवार, विधानसभा संघटक दीपक जगताप, युवासेनेचे प्रदीप पवार, शिरपूर तालुका पदाधिकारी उपजिल्हाप्रमुख भरत राजपूत,
तालुकाप्रमुख अत्तरसिंग पावरा, युवराज पाटील, राजू माळी, योगेश चौधरी ,संतोष माळी,राज राज ढोले, भाऊसाहेब कोळी सह हजारो च्या संख्येने महिला उपस्थित होते
यावेळी मनोगत व्यक्त करताना शिवसेना उपनेते शुभांगी ताई पाटील म्हणाल्या सन 2014 ज्यावेळेस मोदी सरकार सत्तेवर आलं त्यावेळेस या सरकारने महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते आज काय परिस्थिती आहे महागाई गगनाला पोहोचले आहे जीवनावश्यक वस्तूंचे भाव आकाशाला पोहोचले आहे अशा परिस्थितीत सर्वसामान्य महिलांनी घर चालवायचे कसे असा प्रश्न प्रत्येक कुटुंबात निर्माण होत आहे प्रत्येक कुटुंबाचे आर्थिक नियोजन चुकले आहे त्यामुळे या सरकारला घरी पाठवावे लागेल असे त्या म्हणाल्या
यावेळी डॉ. जयश्री वानखेडे कु. मानसी पवार यांनी देखील मनोगत व्यक्त केले ...सूत्रसंचालन प्रियंका ताई पाटील यांनी केले

1
86 views