केवड आश्रम शाळेस सर्वतोपरी मदत करणार…… मा. आ. बबनरावजी शिंदे यांचे प्रतिपादन
माढा प्रतिनिधी....
माढा तालुक्यातील केवड येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ केवड संचलित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा या संस्थेचा 28 वा वर्धापन दिन तसेच संस्थेचे संस्थापक सचिव महारूद्र मामा चव्हाण यांचा 67 वा वाढदिवस हा मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
या वर्धापन दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माढा तालुक्याचे भाग्यविधाते आमदार बबनरावजी शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात जलतज्ञ अनिल पाटील, माढा नगरपंचायतीच्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष ॲड.मीनलताई साठे, वाकवचे सरपंच ऋतुराज सावंत तर उपस्थितीमध्ये उपनगराध्यक्ष कल्पनाताई जगदाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुहास काका पाटील , उपसरपंच नितीन पाडूले, माजी मुख्याध्यापक गजेंद्र सुरवसे, सरपंच कुसुम पाटील, नगरसेविका गीताताई देशमुख, उत्तरेश्वर दादा घाडगे ,चित्रकार रत्नदीप बारबोले,मुख्याध्यापक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष आमोल चव्हाण , संस्थेचे अध्यक्ष अर्जुन लटके , संचालक महारुद्र कदम, क्रीडाधिकारी कैलास लटके, संस्थेचे संस्थापक सचिव महारुद्र मामा चव्हाण, सौ शशिकला चव्हाण, शाळेचे आधारस्तंभ गणेश चव्हाण, व्यवस्थापक कालिदास चव्हाण, प्रशालेचे मुख्याध्यापक नरसेश्वर पाटील, मुख्याध्यापक शिवाजी शिंदे हे व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व प्रमुख आतिथी यांचा सत्कार संस्थेच्या वतीने शाल, पुस्तक , व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर संस्थेचे संस्थापक सचिव मा. श्री महारुद्र मामा चव्हाण यांचा 67 वा वाढदिवस हा व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून करण्यात आला. यानंतर प्रशालेमध्ये राबवण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व मेडल देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच प्रशालेचा विद्यार्थी अनिकेत पांगरकर यांनी योगासनामध्ये विभागीय स्पर्धेत निवड झाल्याबद्दल त्याचा अध्यक्षांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर प्रशालेतील विद्यार्थी पैलवान श्रीकांत पोपट सावंत यांची कुस्ती स्पर्धेमध्ये विभागीय साठी निवड झाल्यामुळे त्याचा देखील सन्मान हा व्यासपीठावर उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर प्रशालेतील विद्यार्थ्यांचे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्यावर मनोगते त्यांनी व्यक्त केली
वाकाव चे सरपंच ऋतुराज सावंत यांनी त्यांच्या भाषणात सांगितले की , केवड सारख्या ग्रामीण भागामध्ये एक छोटीशी शैक्षणिक संस्था 1996 साली उभी करणे हे एक त्या वेळेचे मोठे आव्हान होते व ती यशस्वीरित्या भव्य अशा स्वरूपात नाविन्यपूर्ण रूपाने मामांच्या माध्यमातून उभी राहिली आहे हे एक कौतुकास्पद कार्य आहे या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे शिक्षण घ्यावे व आपण आपल्या आयुष्यात यशस्वी व्हावे आजच्या परिस्थितीमध्ये शैक्षणिक संस्था चालवणे हे एक मोठी आव्हान असून त्यामध्ये केवड आश्रमशाळा ही भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी केवड या गावातील भागात चांगली चालू आहे असे ते म्हणाले,
उपस्थितांमध्ये माढा नगरपंचायतीच्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण कार्य करत असताना आपण प्रत्येक व्यक्तीचा हा गौरव करत असतो पण केवड सारख्या ग्रामीण भागामध्ये आज पाचशे विद्यार्थी शिक्षण घेत असलेली आश्रम शाळा ही चालवणे हे मामांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर या ठिकाणी या प्रशालेत राहणारे मुले व मुली हे विविध गावातील असून ते अनेक जिल्ह्यातील असल्याने ते या ठिकाणी मुक्कामी राहतात परंतु सध्या चालू परिस्थितीला 110 च्या आसपास मुली येथे शिक्षण घेतात व त्यांना त्यांच्या घरच्यासारखी काळजी व त्यांची जबाबदारी ही संस्था उत्तमरीत्या पार पाडत आहे. असून त्यांनी या भागातील लोकांचे परिस्थिती ओळखून येथे 1996 सालापासून आश्रम शाळा चालू केली व ते आज चांगल्या पद्धतीने नावरूपास आणलेली आपणास पहावयास मिळते .
जलतज्ञ अनिल पाटील यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितले की ,शाळेमध्ये विविध उपक्रम हे राबवले जातात शाळेतील परिसर हा विविध वृक्षाने भरलेला असून प्रशालेने अजून एक नवीन उपक्रम हा विद्यार्थ्यांमधून नवीन वृक्ष निर्मिती करावी असे त्यांनी त्यांच्या भाषणात विद्यार्थ्यांना सांगितले भविष्यामध्ये प्रदूषणाचे जर समतोल साधायचे असेल तर प्रत्येकाने जबाबदारी उचलून प्रत्येकाने कमीत कमी एक तरी वृक्ष हा लावलाच पाहिजे हे आपण प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून साकार करू शकतो .
अध्यक्ष भाषणामध्ये माढा तालुक्याचे आमदार बबनरावजी शिंदे यांनी त्यांच्या भाषणांमधून केवड या छोट्या गावात महारूद्र मामा चव्हाण यांनी हि संस्था उभी केली वीस पटसंख्या असलेले संस्था आज 500 विद्यार्थी या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत .विविध तालुक्यातून जिल्ह्यातून या प्रशालेमध्ये विद्यार्थी पहिली ते बारावी साठी शिक्षण घेण्यासाठी येतात. महारुद्र मामांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून ही संस्था उभा केली .ही संस्था उभा करायच्या आधी त्यांनी मुंबई येथे माल धक्यामध्ये काम केले तेथे काम करत असताना त्या ठिकाणची परिस्थिती बघितल्यानंतर त्यांना वाटले की, आपण आपल्या गावामध्ये सुद्धा गावातील लोकांच्या प्रति समाजभिमुख असे काम केले पाहिजे म्हणून त्यांनी तेथील नोकरी सोडून गावी येऊन 1996 साली ही आश्रम शाळा उभी केली व या आश्रम शाळेत आज भटक्या विमुक्त जाती जमातीचे मुले हे शिक्षण घेतात एखादी संस्था ग्रामीण भागात उभी करणे हे अवघड काम असून त्यात आश्रमशाळा उभी करणे व ते चालवणे व या प्रशालेमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारणे ही एक मोठी बाब आहे .आपण त्यांचे कौतुक करेल तेवढे कमीच आहे या शाळेसाठी भविष्यामध्ये काही अडचण आल्यास मी त्यांना आमदार फंडातून मदत करेल असे त्यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून संबोधित केले .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश जाधव सर यांनी केले. तर प्रास्ताविक वीरेंद्र मोरे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक नरसेश्वर पाटील सर यांनी केले या वर्धापन दिनाच्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक, विद्यार्थी ,गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.