logo

महाराष्ट्र मध्ये मातंग समाजावर अन्यायात वाढ़, न्याय व हक्का साठी मातंग समाज एकत्र येणार आहे. कारण आंदोलन, करून हि न्याय मिळत नाही, सरकार चे या समाजाकडे लक्ष नाही,....

सविस्तर बातमी -
देश स्वतंत्र झाला, संविधानाने सर्व समाजाला न्याय व हक्क मिळाला, पण फक्त कागदावर च मातंग समाजाला स्वतंत्र मिळाले आहे. आज हि या सामाजावर खूप मोठा अन्याय होत आहे. हा समाज राज्यात नव्हे तर इतर हि राज्यात विखूरलेला आहे. सर्व समाज सुधारले, पण आज हि,हा समाज अशिक्षित, अडाणी,गरीब राहिला आहे. संविधानाने या समाजाला खूप हक्क व अधिकार दिले आहे, परंतु उच्चवरणीय समाज दडप शाही करून या समाजावर अन्याय करीत आहे. या समाजाने किती हि आवाज उठावला तरी त्याची दखल घेतली जात नाही. राज रोस या लोकांच्या जमिनी लुबाडल्या जातं आहे. मुली, स्रिया यांच्या वर आत्याचार होत आहे. न्याय व्यव्यस्था तर या लोकांन कडे लक्ष हि देत नाही.राजकारणी फक्त मत मागण्यासाठी च येतात. हा अन्याय विरुद्ध पुणे येथे या समाजाला एकत्र आणून अन्याया विरुद्ध लढा देण्यासाठी एक मोठी चळवळ व संघटना तयार झाली आहे, या संघटने तर्फे या समाजाच्या वृद्धी साठी सर्व काही केले जाईल. न्याय जर हक्काने मिळाला नाही तर साम, दाम, दंड याचा अवलंब केला जाईल, शक्यतो शांततेत, न्याय व हक्क मागितला जाईल, लवकरच राज्यात या संघटनेचे काम सुरु होणार आहे, या संघटनेत कोणी राजकीय नेता, कोणाची आर्थिक मदत न घेता समाजाकडून थोडी आर्थिक मदत घेऊन न्याय मिळविणार आहे...
बातमीदार -
काळुराम राजगुरू, पुणे.

41
5268 views