logo

खरीप हंगामातील शासनाने मंजूर केले अर्थसहाय्य लवकरात - लवकर वाटप करण्याकरीता प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका कृषी अधिकारी कळमेश्वर यांना निवेदन

कळमेश्वर
दि.३०/०९/२०२४ रोजी तालुका कृषी अधिकारी श्री.जुमडे कळमेश्वर यांना प्रहार जनशक्ती प्रहार पक्षातर्फे महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे २०२३ खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट शासनाने अर्थसहाय्य म्हणून ५००० रुपये मंजूर केले आहे ते अर्थसहाय्य तालुक्यातील शेतकऱ्यांना लवकरात-लवकर वाटप करण्यात यावे याकरिता निवेदन देण्यात आले.त्यावर तालुका कृषी अधिकारी श्री.जुमडे यांच्यातर्फे येत्या पाच ते आठ दिवसात योग्य ती कारवाई करून शेतकऱ्यांना लवकरात-लवकर शासनाने मंजूर केलेले अर्थसहाय्य वाटप करण्यात येईल असे आश्वासन प्रहार जनशक्ती पक्षाला दिले आहे.
यावेळी निवेदन देताना प्रहार जनशक्ती पक्षाचे सावनेर विधानसभा अध्यक्ष मिलिंद भाऊ डहाके,सावनेर तालुका संघटन प्रमुख अनिल भाऊ केने,कळमेश्वर तालुका प्रमुख मनीष भाऊ देशमुख, तेलकामठी जिल्हा परिषद सर्कल प्रमुख राहुल भाऊ लांडे,कळमेश्वर शहर प्रमुख श्री.मुस्ताक भाऊ शेख,हत्तीसरा गाव शाखाप्रमुख श्री.दिनेश भाऊ चाके उपस्थित होते.

137
8156 views