logo

शेलीपालन व्यवसायाद्वारे आरसेटी नागपुर संस्था जनतेला सक्षम बनवणार

नागपूर :-
ग्रामीण भागातील जनतेचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातुन व शेतीला पूरक व्यवसाय म्हणून बैंक ऑफ़ महाराष्ट्र आरसेटी नागपुर वतिने सावनेर तालुक्यातील हत्तीसरा गावामध्ये उमेद बचतगट अंतर्गत रंजनाबाई संजय टेकाडे (सीआरपी गट ) आणि दिनेश रा चाके (सामाजिक कार्यकर्ता ) यांच्या पुढ़ाकाराने बैंक ऑफ महाराष्ट्र महाबैंकआरसेटी नागपूर चे मार्गदर्शक नागपुरे आणि गेडाम सरांच्या मदतीने श्री संजय टेकाडे यांच्या घरी १७/०९/२०२४ ते २६/०९/२०२४ असे१० दिवसीय बंदिस्त शेलीपालन प्रशिक्षण सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत देण्यात आले संस्थेतर्फे प्रशिक्षणार्थी ला मिडनार्या सुविधा: मोफत अर्ज वाटप, २ टाईम चाय,२ टाईम भोजन, ड्रेस वाटप, प्रशिक्षण झाल्याबरोबर सर्टिफिकेट मिळाले.या मध्य ३५ महीला पुरुष यानी उत्साही होत प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आरसेटी श्रद्धानंद पेठ गव्हर्नमेंट आय.टी.आय नागपुर ला २६ तारखेला लेखी तोंडी परीक्षा संपन्न झाली बंदिस्त शेलीपालन व्यवसायचे प्रशिक्षण श्री घोनमोडे सरानी (चंद्रपुर )अत्यंत सोप्या पद्धतीने वा कमी खर्चिक शेलीपालन शिकविले आणि सुंदर खेलाद्वारे मनोरंजन केले यात बहुतांश महीला पुरुष यानी सहभागी होत प्रशिक्षण पूर्ण केले . अशाप्रकारचे प्रशिक्षण घेऊन सहभागी महीला पुरुषानी संस्थेचे व आयोजकाचे आभार मानले व श्री चंदू नागपुरे श्रीमती रंजना संजय जी टेकाडे आरसेटी डायरेक्टर श्री संतोष रामगीरवार सरानी लवकरच व्यवसाय चालू करा अशा शुभेच्छा देण्यात आल्या.

26
3222 views