
प्रधानमंत्री आवास योजना बोऱ्हाडेवाडी, येथे नागरी समस्या, पालिका सुस्त, लाभार्थी त्रस्त,घराचा ताबा १ ऑगस्ट २०२३ मध्ये दिला व प्रॉपर्टी टॅक्स २०२१ पासून लावला
पिंपरी चिंचवड पुणे / ईश्वर वाघ : पंतप्रधान आवास योजना बोऱ्हाडेवाडी येथे केंद्र आणि राज्य शासनाच्या धर्तीवर साकरण्यात आलेला 1288 घरांचा गृहप्रकल्प आहे. (pcmc)
या घरांचा ताबा मिळण्या अगोदरच तेथील लाभार्थी नागरिकांकडून सदनिकेच्या किमती गेल्या 2 वर्षापासून व्याजासह वसूल करण्यात आल्या. तरीदेखील तब्बल 2 वर्षाच्या काळानंतर ताबा मिळूनही अद्याप तेथे मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. (pcmc)
व घराचा ताबा १ ऑगस्ट २०२३ मध्ये दिला व प्रॉपर्टी टॅक्स २०२१ पासून लावला आहे व त्यांनी न मोजणी करता च चुकीच्या पद्धतीने क्षेत्रफळ लावले व मन मणी कारभार करून टॅक्स आकारला गेला आहे त्यावर पालिका प्रशासन काहीच बोलायला तयार नाही व गरिबांना जर वर्षाला येवडा टॅक्स भरावा लागत असेल तर गरीब जनता भरणार कसा असा सवाल नागरिकांनी पालिकेस केला आहे , आम्हास रीतसर टॅक्स लावावा व क्षेत्रफळ योग्य आहे त्यानुसारच टॅक्स आकारणी करावी असा सवाल पालिकेस तेथील नागरिकांनी केला आहे ,
ठिकठिकाणी तुंबलेली गटारे, अपुरा पाणी पुरवठा, सदनिकेत छतातून टपकणारे पाणी, सांडपाणी / मैला शुद्धीकरण याची दुर्गंधी, वीज गेल्यास पर्यायी सुविधा उपलब्ध नाही, पार्किंग सुविधा नाही, चेंबरचे पाणी जायला पाईपलाईन नाही, सार्वजनिक उत्सव समारंभ व उद्यान याचे काम अजून अद्याप झालेले नाही, इत्यादी अनेक सुविधा बाबत येथील लाभार्थी मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारी करून त्रस्त झाले आहेत.
पाण्याच्या टाकीची ऊंची जमिनीलगत असल्याने पावसाचे पाणी पिण्याच्या टाकीत जाण्याची शक्यता. STP मधून प्रक्रिया करून आलेले सांडपाणी आणि पिण्याचे पाणी एकाच ठिकाणी एकलगट असलेला साठा. गती रोधक नसल्याने भरधाव येणारी वाहने वेग नियंत्रित होत नाहीत. (pcmc)
अशा अनेक विळख्यांनी वेढलेल्या नागरिकांची ही वसाहत आजच्या काळात वावरत आहे. प्रधानमंत्री आवास योजना बाबत येथील गरीब नागरिकांच्या विविध समस्या निवारण करण्यासाठी संबंधित प्रशासनाने मूलभूत समस्या निवारण करण्यासाठी अग्रक्रम द्यावा, असे केंद्र सरकारचे स्पष्ट आदेश आहेत. मनपा मध्ये प्रशासकीय राजवट आल्यापासून पालिका प्रशासन सुस्त झालेली आहे.
बोऱ्हाडेवाडी येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल धारकांच्या प्रश्नाकडे
पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन लक्ष देणार आहे का ? असा सवाल येथील रहिवाशी विचारत आहेत. अशा खूप समस्या आज लाभार्थ्यांना आहेत.यावर लवकर जर तोडगा नाही निघाला तर लवकरच याचा भडका होऊन, एक मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभे राहू शकते.
अशा प्रकारे छत गळणे,भिंतीतून पाणी पाझरणे तसेच कॉमन समस्या विषयी बोऱ्हाडेवाडी मोशी येथील त्रस्त लाभार्थीचे म्हणणे आहे की, पालिका प्रशासनिक अधिकारी फक्त आम्ही करून देतो, अशी आश्वासने देतात, पण आता पर्यंत कुठलेही ठोस पाऊल उचलले गेले नाहीत.
तरी या वर लवकरात लवकर ठोस निर्णय घेऊन सर्व पेंडिंग कामे पूर्ण करून द्यावीत, अन्यथा बोऱ्हाडेवाडी येथील लाभार्थी महापालिकेच्या विरोधात आंदोलन करण्याची शक्यता आहे. असे अनेक त्रस्त लाभार्थीनी सांगितले.
याच्यातून असे कळते आहे कि या प्रकल्पात भ्रष्ट्राचार झालेला दिसून येत आहे ,कारण येथील नागरिक तकरार करौनही त्यांना उत्तर पालिका देत नाही व तेथील कामे पण करत नाही सामान्य नागरिकांवर अन्याय होताना दिसून येत आहे