logo

दै.स्वराज्य तोरणच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त *सन्मान वर्दीचा चौथ्या स्तंभाचा* कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न!

संपादक डॉ.किशोर पाटील यांनी आयुष्यभर स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारिता करावी -खा. सुरेश म्हात्रे
संपादक डॉ.किशोर पाटील यांनी पैसा कमावण्यापेक्षा माणसं जमवण्याचे काम केले आहे- रुपेश महात्रे
भिवंडी (स्व.रा.तो)
दै.स्वराज्य तोरणच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त
*सन्मान वर्दीचा चौथ्या स्तंभाचा* कार्यक्रम मोठ्या उत्साहात पूर्ण वातावरणात रविवार दि.२२ सप्टेंबर २०२४ रोजी बी.एन.एन. महाविद्यालया च्या सभागृहात शिवसेना भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख तथा भिवंडी पुर्वचे माजी आमदार श्री.रुपेश दादा म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला!
यावेळी विशेष
सत्कारमूर्ती म्हणून भिवंडी लोकसभेचे खासदार श्री.सुरेश गोपीनाथ म्हात्रे (बाळ्या मामा) ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त श्री.पंकज शिरसाट आवर्जून उपस्थित होते. तसेच समाज कल्याण न्यासचे अध्यक्ष डॉ.सोन्या काशिनाथ पाटील,आर.एस.पी.चे कायदे विषयक सल्लागार श्री.के डी पाटील,बी एन एन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक वाघ,भिवंडी मनपाचे माजी उपमहापौर श्री.मनोज मोतीराम काटेकर, भिवंडी मनपा शिक्षण मंडळाचे माजी सभापती श्री.सुंदर शेठ नाईक, डॉ.श्री.जालिंदर भोर विश्वस्त साईबाबा शिर्डी संस्थान, ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष श्री. पंडित नकुल पाटील, दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉ.श्री. विश्वासराव आरोटे, आर.एस.पी. चे विभागीय समादेशक श्री.दिलीप विष्णू स्वामी, आर.एस.पी.कमांडर डॉ.मनीलाल रतिलाल शिंपी, श्री. महादेव क्षीरसागर, शिवसेना भिवंडी जिल्हा प्रमुख श्री.मनोज गगे,मनसे भिवंडी शहर प्रमुख श्री.मनोज गुळवी,माळशेज नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ह भ प चंद्रकांत महाराज डुंबरे.महाराष्ट राज्य पत्रकार संघाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष दशरथ चव्हाण.विष्णु बुरे.उत्तमराव कानवडे,शिवसेना उपशहर प्रमुख डॉ.भगवान ठाकूर, कैलास नगर वळपाडा गावातील प्रसिद्ध उद्योजक श्री.अरुण बळाराम पाटील, माजी सरपंच श्री.संजय कृष्णा पाटील,श्री.माणिक पाटील ज्येष्ठ समाजसेवक
अध्यक्ष: लाठी काठी असोसिएशन ठाणे,
श्री.राज परब अध्यक्ष महाराष्ट्र पत्रकार संघ ठाणे,श्री. गोकुळ पाटील शिक्षक संघटना नेते,स्वराज्य तोरणचे कार्यकारी सदस्य डॉ.विनोद पाटील,पंडीत पाटील,संतोष पाटील,संजय नाईक,जगदीश पाटील,प्रितेश पाटील, डॉ.श्री.नितीन नारायण पाटील (शुश्रुषा हॉस्पिटल)सह्याद्री पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँड.श्री.संजय यशवंत पाटील, पोलीस पाटील संघटनेचे माजी अध्यक्ष श्री.सोमनाथ बाळाराम ठाकरे आदी मान्यवर आर.एस. पी.अधिकारी व मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.
यावेळी दै.स्वराज्य तोरणच्या १६ व्या वर्धापन दिन विशेषांकाचे मान्यवरांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सन्मान दै.स्वराज्य तोरणचे संपादक डॉ.किशोर पाटील आणि स्वराज्य तोरणचे कार्यकारी सदस्य यांनी केला. मान्यवरांच्या शुभहस्ते आर.एस.पी.अधिकारी आणि सर्व पत्रकार बंधूंचा सन्मान शाल,पुष्पगुच्छ,
सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन करण्यात आला. स्वराज्य तोरण च्या जडणघडणीत ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आभार व ऋण संपादक डॉ.श्री. किशोर पाटील यांनी प्रास्ताविक करताना मानले.
गेली अनेक वर्ष सातत्याने संपादक डॉ.किशोर पाटील हे पत्रकारिता करीत आहेत. त्यामुळे ते तुमच्या आमच्या सर्वांच्या संपूर्ण भिवंडी तालुक्याच्या परिचयाचे आहेत. पत्रकारिता हा देशाचा चौथा स्तंभ म्हणून पाहिला जातो. पत्रकारिता ही निर्भीड असावी, स्पष्टोक्तपणे मत मांडणारी असावी, कुठलाही पक्षपातीपणा नसावा आणि या सर्व गोष्टी आपणाला पण अपेक्षित आहेत, या अपेक्षित गोष्टी प्रमाणे जे पत्रकारीता गेली अनेक वर्ष करीत आहेत ते तुमच्या आमच्या सर्वांचे स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री.किशोरजी पाटील.आज दुग्ध शर्करा योग आहे कारण स्वराज्य तोरण चा 16 वा वर्धापन दिन व त्यांचा आज वाढदिवस म्हणून त्यांना माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून व संपूर्ण भिवंडी लोकसभा क्षेत्राच्या वतीने मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो.आणी संपादक डॉ.किशोर पाटील यांना आयुष्यभर स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारिता त्यांना करता यावी म्हणून भविष्यात निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो असे मनोगत व्यक्त करताना भिवंडी लोकसभेचे खासदार श्री.सुरेश गोपीनाथ म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी सांगितले.
16 वर्ष अखंडित पणे सुरू असलेले दैनिक स्वराज्य तोरण आपण वाचत आलोय,या दैनिकामुळे संपादक डॉ.किशोर पाटील यांनी भिवंडी तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये नाव केले आहे. या दैनिकाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या समाजातील तळागाळातील लोकांना प्रबोधन करण्याचे काम संपादकांनी केले आहे. आणि ते मिरर पत्रकारिता करत आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देतो व वाढदिवसानिमित्ताने आपण खाकी वर्दीचा सन्मान व पत्रकारांचा सन्मान करत आहात त्यामुळे मी आपल्या कार्याला सलाम करतो .आपण आयुष्यात किती पैसा कमावला त्यापेक्षा माणसे किती जमवली हे फार महत्त्वाचे आहे.व ते प्रत्यक्ष समोर दिसत आहे. आपण सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जातीय सलोखा राखण्याचे काम केले पाहिजे त्याचबरोबर वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे हे देखील काळाची गरज आहे. असे अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना माजी आमदार रुपेश दादा म्हात्रे यांनी सांगितले. वाहतुकीच्या नियमांचे पालन काटेकोरपणे आपण केले तर कोणताही अपघात होणार नाही त्याचप्रमाणे वाहतूक कोंडी देखील होणार नाही म्हणून नियम पाळणे ही कालाची गरज आहे असे पोलीस उपायुक्त श्री.पंकज शिरसाट वाहतूक विभाग ठाणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.या संपुर्ण
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिवंडीचा बुलंद आवाज श्री.राजेंद्र पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.प्रा.विनोद हनुमान पाटील यांनी केले.

4
1375 views