*शिरूर ताजबंद दुकाने,शाळा* *कडकडीत बंद* ...
शिरुर ताजबंद / अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला 23/09/2024 ,शाळा,महाविद्यालये , व्यापार्यांनी आपली दुकाने बंद ठेवून शिरुर ताजबंद येथिल जनतेचा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाला १०० % पाठींबा मिळाला .
अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून ५० % च्या आतील आरक्षणाच्या मागणी साठी व आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या स्मरणार्थ पाठींबा म्हणुन बंद सोमवारी पुकारण्यात आला होता . येथील व्यापारी, कष्टकरी ,शाळा - महाविद्यालय व सर्व जनता यांनी दिवसभर बंद ठेवून पाठींबा दर्शविला . सकाळी येथील सकल मराठा समाज बांधवांनी बाजार पेठेत रॅली काढून बंद मध्ये सहभागी होवून पाठींबा देण्यासाठी आवाहन केले . सर्व स्तरातून १०० % पाठींबा मिळाला .
समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभा घेवून शासनाकडे समाज बांधवांनी आरक्षण देण्याची मागणी केली . तसेच शिवश्री मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा दर्शविला . तसेच बंद शांततेत करुन सहकार्य करण्याचे आवाहन केले . बंद मध्ये सहभाग नोदवल्या बद्दल आभार मानले . प्रशासन व पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होताया वेळी;पोलीस जमादार बाळासाहेब परशुराम साळवे ,पोलीस अंमलदार शिवशंकर नवनाथ चोले;पोलीस अंमलदार ज्ञानोबा रामराव केंद्रे.. उपस्थित होते व यावेळी सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने प्रस्ताविक शिवश्री संतोष महापूरे यांनी केले तर; सखोल असे मार्गदर्शन;शिव.श्री. शिवानंदजी भोसले यांनी मनोगत व्यक्त करून मागणी मांडली व या वेळी; बालाजी जवळगे, उद्धव भोसले, दत्तात्रेय जवळगे, संजय कुमार चव्हाण,गोविंद कापसे, अमोल भोसले,उमाकांत कदम,बाळासाहेब डोंगरे, विश्वनाथ जाधव, कैलास खेडकर, मंगेश खेडकर, गजानन पडोळे, काळे संजय, परमेश्वर वाडवणकर, माधव जवळगे,शिवाजी कापसे,माधव हाजारे,विनोद ढेपे, आणाराव कुंडलवाडे,युवराज शिंदे,शंकर शिंदे, लक्ष्मण गवळी,अजिंक्य भोसले,बालाजी पडोळे यांनी सवींचे आभार मानले . यावेळी शिरूर ताजबंद व परिसरातील गावोगावचे समाज बांधव व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते...जन जन की आवाज सोशल मीडिया एक्जीक्यूटिव रिपोर्ट शिवाजी श्रीमंगले .एम एच .लातूर (महाराष्ट्र)