logo

बाभळेश्वर येथे सुधीर म्हस्के यांच्या कार्यालयास आमदार रोहित पवार यांची सदिच्छा भेट

बाभळेश्वर :रयत शिक्षण संस्था येणार्‍या आव्हानांना यशस्वीपणे सामोरे जात असून शिक्षण क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था ठरत आहे. रयतच्या विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास वाखाण्याजोगा आहे, असे प्रतिपादन जनरल बॉडी सदस्य आमदार रोहित पवार यांनी केले.आमदार रोहित पवार यांनी नुकतीच अहमदनगर शिर्डी प्रवासादरम्यान बाभळेश्‍वर येथील सुधीर म्हस्के यांच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य रावसाहेब म्हस्के पाटील यांनी आमदार रोहित पवार यांचे स्वागत करून सन्मान केला. आदरणीय शरद पवारसाहेब हे प्रवरानगर येथील महात्मा गांधी संकुलाचे माजी विद्यार्थी असून सध्याच्या काळातील महात्मा गांधी विद्यालयाच्या गुणवत्तेविषयी प्राचार्य अंगद काकडे यांनी आमदार रोहित पवार यांना माहिती दिली. यावेळी आमदार रोहित पवार यांनी सांगितले की, रयत शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांची बौद्धिक गुणवत्ता वाढत असून विद्यार्थी ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाच्या बाबतीत उत्तुंग झेप घेत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी संकुलाच्या वतीने प्राचार्य अंगद काकडे यांनी आमदार रोहित पवार यांचा सन्मान केला. याप्रसंगी जनरल बॉडी सदस्य रावसाहेब म्हस्के, सुधीर म्हस्के, माजी प्राचार्य जी. टी. गमे, प्र. पर्यवेक्षक संजय ठाकरे,विद्या विकास पब्लिक स्कुलचे प्राचार्य राजेंद्र नालकर,डॉ. शरद दुधाट, विश्‍वास मोहिते, विठ्ठल म्हसे, सागर निगुडे, बाबासाहेब अंत्रे, अमोल कडू, मोहीन शेख, श्री ज्ञानेश्वर कांदाळकर यांच्यासह शिक्षक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

71
4174 views