logo

मुख्यमंत्री,माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत नूतन ज्ञान मंदिर विद्यालयाला द्वितीय क्रमांकाचा बहुमान

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-२ सन 2024-25 हे अभियान राज्यभर राबविण्यात आले. या अभियानात विविध मूल्यमापन पद्धतीतून बक्षीस पात्र शाळेची निवड करण्यात आली. शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, तसेच आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण मिळावे या उद्देशाने या स्पर्धात्मक अभियानात चोपडा तालुक्यातून अनेक शाळांनी सहभाग नोंदवला होता. तालुकास्तरीय निवड समितीचे अध्यक्ष व गटशिक्षणाधिकारी साहेब श्री अविनाश पाटील केंद्रप्रमुख श्री अजित पाटील श्री देवेंद्र पाटील , श्री दीपक पाटील यांनी नुकताच तालुकास्तरीय प्रथम, द्वितीय क्रमांक घोषित केले. त्यात अडावद ता. चोपडा जि. जळगांव येथील नूतन ज्ञान मंदिर विद्यालयाला द्वितीय क्रमांकाचा बहुमान प्राप्त झाला. मुख्याध्यापक श्री. आर. जे. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याध्यापक श्री. एस. के. भंगाळे, पर्यवेक्षक श्री.के.आर. कणखरे,सर्व शिक्षक वृंदांनी,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी अतिशय नियोजनबद्ध कामकाज करून विद्यालयाला हा बहुमान प्राप्त करून दिला,त्याबद्दल संस्थेचे चेअरमन श्री. डॉ. के. पी. थेपडे व संस्थेचे सचिव आदरणीय सौ सुषमा ताई थेपडे तसेच संचालक मंडळ यांनी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे हार्दिक अभिनंदन केले.

पालक वर्गाकडून अभिनंदनचा वर्षाव
चोपडा तालुक्यातून नूतन ज्ञान मंदिर विद्यालयाला द्वितीय क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाल्याने पालक वर्गात ही आनंद दिसून आला. अडावद नगरी व परिसरासाठी ही आनंदाची व अभिमानाची बाब आहे, अशी पालकांनी भावना व्यक्त केली. अनेक पालकांनी प्रत्यक्ष भेट देऊन फोन करून अभिनंदनचा वर्षाव केला. मुख्याध्यापक श्री. आर. जे. पवार यांनी या दैदीप्यमान यशाचे श्रेय सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांना दिले.

29
3857 views