
उमरा उपकेंद्रात अग्नितांडव
उमरा उपकेंद्रात अग्नितांडव
अकोला प्रतिनिधी पुर्णाजी खोडके
अकोल्यातील अकोट तालुक्यातील ग्रामीण भागाला वीज पुरवठ्याची जबाबदारी असलेल्या वीज उपकेंद्रातच प्रचंड आग भडकली. सोमवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास अकोट तालुक्यातील उमरा येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रात हा आगडोंब उसळला होता. या आगीत क्र १ चे ५ एमव्हिए अश्वशक्तीच्या रोहित्र मुख्य ट्रान्सफार्मरच( रोहित्र) जळून खाक झाले आहे.
ट्रांसफार्मरच्या रेडीयेटर लीकेज मुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ३३ केव्ही उपकेंद्रातील क्र.१ चे मुख्य ट्रान्सफार्मर खाक झाले आहे. ट्रान्सफॉर्मरने मोठा पेट घेतल्यामुळे आगीचे लोळ उठले. पाच किलोमीटर अंतरावरून आगीचे लोळ दिसत होते. या ट्रान्सफार्मरवरून परिसरातील 5 ते 6 गावांना वीज पुरवठा केला जातो. मात्र दरम्यान अचानक लाग लागल्याने सदर कार्यालयातील कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. त्यांनी तातडीने कार्यकारी अभियंता यांना घटनेची माहिती देऊन अग्निशामक दलाला पाचारण केले अग्निशमन दलाने एका तास शर्तीच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. तोपर्यंत क्र.१ चे ५ मेगावॉटचे मुख्य ट्रान्सफार्मर खाक झाले. मात्र आग आटोक्यात आल्याने पुढील गंभीर हानी टळली. अन्यथा याच ३३ केव्ही उपकेंद्रात असलेले क्र.२ चा ५ मेगावॉटचा ट्रान्सफार्मर सुद्धा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडण्याचा धोका होता. घटनास्थळी उमरा येथील सहायक अभियंता, अकोट येथील कार्यकारी अभियंता दाखल झाले होते. आगीत वीज वितरण कंपनीचे १२ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे कार्यकारी अभियंता उईके यांनी सांगितले.
रेडियेटर लिकेज मुळे ५ एमव्हिए अश्वशक्तीच्या रोहित्रातुन ऑईल गळती झाल्याने उपकेंद्राच्या आवारातील या रोहित्राणे पेट घेतला. वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता अनिल उईके, टेस्टिंग विभागाचे उप कार्यकारी अभियंता काळे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. सदर उप केंद्रातुन ५ ते ६ गावांना विद्युत पुरवठा होतो. हे पॉवर रोहित्र जळाल्याने क्र २ च्या रोहित्रावरूण विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तर लवकरच उर्वरित विद्युत पुरवठा सुरळीत करणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असल्याचे कार्यकारी अभियंता उईके यांनी सांगितले..
कोडं....
उमरा उपकेन्द्रतिल क्र 1 चे रोहित्र हे 29 वर्षा पासुन कार्यरत होते त्यामधे रेडियेटर मधुन ऑइल लिक होऊन आग लागली मला माहिती मिळताच अग्निशमन विभागाला सदर घटनेची माहिती दिली व घटनास्थळ गाठले
अनिल उईके
मुख्य कार्यकारी अभियंता
अकोट विभाग
कोडं...
सकाली 8.50 च्या सुमारात उपकेंद्रतील रोहित्र 1 ला आग लागली असता रोहित्र 1 हे अग्निच्या ज्वालामधे होते घटनास्थळी जाऊन उर्वरित साहित्यला अग्नीपासुन दूर करत अग्निशमन दलाच्या सह्याने अग्निवर नियंत्रण मिळवले
रमेश चांदूरकर
सहायक अभियंता
उमरा उपकेन्द
कोडं...
उमरा उपकेंद्रात पॉवर ट्रान्सफॉर्मरला आग लागण्याची माहिती नगर परिषद अकोट अग्नीशमन दलाला मिळताच अकोट अग्निशमन विभागाचे कर्मचारी त्वरीत घटनास्थळी पोहोचले व आगी वर नियंत्रण मिळविले
अभिषेक काळे
अग्निशमन अधिकारी अकोट