logo

*संगमनेर शहर कार्याध्यक्ष पदी सुरेश खामकर यांची नियुक्ती...*

*संगमनेर शहर कार्याध्यक्ष पदी सुरेश खामकर यांची नियुक्ती...*

संगमनेर प्रतिनिधी
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे गटनेते
आमदार बाळासाहेब थोरात साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या मार्गदर्शनाखाली व अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष बंटी यादव यांच्या नेतृत्वाखाली सुरेश खामकर यांची संगमनेर शहर कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
गेली अनेक वर्ष काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या विविध पदावर काम करणारे आणि पत्रकारितेच्या माध्यमातून कायम लोकांचे विषय केंद्रस्थानी मांडणारे सुरेश खामकर यांची निवड अतिशय महत्त्वाची समजली जाते.
काँग्रेसचे विचार तळागाळातील, शोषित वंचित समूहापर्यंत पोहोचवण्याचं काम ते अत्यंत प्रामाणिकपणे करत असतात. समाजातील अन्याय, अत्याचार अशा घटनेमध्ये सातत्याने पुढे असणारे. सुरेश खामकर यांच्यावर जिल्हाध्यक्ष बंटी यादव यांनी संगमनेर शहर कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे.
यावेळी त्यांच्या निवडीचे अभिनंदन
माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा जयश्री थोरात, आदींनी यावेळी त्यांच्या निवडीचे अभिनंदन केले.

16
7690 views