logo

आयुष्मान भारत योजनेमध्ये झाला मोठा बदल ; यापुढे ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मोफत वैद्यकीय उपचार ; केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव..!!

पुणे विभागीय संपादक- संजय चांदगुडे

दिल्ली,केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल करुन निर्णय घेतला आहे. ११ सप्टेंबर रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ७० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्व वय वृद्ध नागरिकांचा आता आयुष्मान भारत योजनेमध्ये समाविष्ट करण्याचा ऐतिहासिक निर्णय कॅबिनेट मंत्रीमंडळाकडून घेण्यात आला आहे. याबरोबरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले आहेत. बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माध्यमांना सांगितले आहे की, प्रधानमंत्र्यानी त्यांच्या निर्णयाशी वचन बद्धता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यापूर्वी ही म्हणाले होते की, ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना यापुढे आयुष्मान भारत योजनेमधून कव्हरेज दिले जाणार आहे.

तसेच सदरील योजनेची व्याप्ती वाढल्यामुळे आता ४.५ कोटी कुटुंबांचा समावेश आता यामध्ये होणार असून त्यामध्ये ६ कोटी ज्येष्ठ नागरिकांचा समावेश यापुढे करण्यात येणार आहे. तसेच याअंतर्गत प्रत्येक नागरिकाला ५ लाख रुपयांचे मेडिकल कव्हर यापुढे दिले जाणार आहे. आतापर्यंत ७० वर्षांपर्यंतचेचं ज्येष्ठ नागरिक या योजनेच्या कक्षेत होते. या योजनेंतर्गत ५५ कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे. हे लाभार्थी सुमारे १२.३४ कोटी कुटुंबा मधील आहेत.

आयुष्यमान भारत योजना

केंद्र सरकारने २०१७ साली ही योजना सुरु केली होती. आयुष्मान भारत योजना ही जगातील सर्वात मोठी विमा योजना आहे, जी सध्या देशातील सर्वात गरीब ४० टक्के लोकांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार प्रदान करत आहे. राष्ट्रीय आरोग्य धोरणांतर्गत केंद्र सरकारने २०१७ साला मध्ये ही योजना सुरु केली होती. परंतू,पश्चिम बंगाल सह अनेक राज्ये ही योजना स्वीकारण्यास नकार देत आहेत तसेच ती राज्य ही आपल्या राज्यांमध्ये स्वतः तयार केलेल्या आरोग्याच्या योजना चालवत आहेत.

सदरील योजनेमध्ये संपूर्ण देशातील निवडक सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करता येतात. या योजनेमधील प्रवेशाच्या १० दिवस आगोदरचा आणि नंतरचा खर्च भरण्याची सुद्धा तरतूद आहे. या योजनेमध्ये सर्व आजारांचा समावेश करण्यात आला आहे. कोणत्याही आजारासाठी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आणि नंतरचा खर्च कव्हर दिला जातो. तसेच वाहतुकीवरील खर्चाचा सुद्धा समावेश होतो, तसेच सर्व वैद्यकीय चाचण्या, ऑपरेशन्स, उपचार इत्यादी गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. या योजनेमधून आतापर्यंत ५.५ कोटींहून अधिक लोकांनी उपचार घेतले आहेत.

109
12313 views