logo

पुणे.आळंदी खड्यांमुळे अपघात

मरीआई मातेच्या समोर कॉर्नरला ज्या ठिकाणी मरकळला जाताना आणि पोलीस स्टेशनच्या मार्गाने जाताना आळंदीच्या मार्गाने येताना जर आपणास भले मोठे दोन खड्डे लागतात ते चुकवताना चुकवता चुकवता येत नाही तेव्हा कोणत्या ना कोणत्या खड्ड्यात पाटदिशी गाडी पडती पडल्यानंतर त्या ठिकाणी डबल सीट जर असेल तर ती व्यक्ती दबकन खाली पडते खाली पडून रक्त बंबाळ होते त्यानंतर त्या ठिकाणी पोलीस मदतीला येतात आणि त्या टू व्हीलर बाइक वाल्याला सावरून ज्यांना लागलेला आहे त्याला विचारपूस करतात , पुन्हा त्याला म्हणतात बाळा हळू चालव , खड्डे भले मोठे आहेत, तुझ्या तब्येतीची काळजी घे ही बाब अति महत्वपूर्ण आहे ही बाब वाहतूक पोलिसांना कळली मात्र आळंदी प्रशासनाला आपल्या परिसरातील आपल्या पालिकेला कुठलेच नगरसेवक नसताना या ठिकाणचे काही खड्डे जीवघेणे आहेत त्यावर मलमपट्टी करणे नागरिकांचे काम नाही मात्र पालिकेचे तर निश्चित आहे त्याबाबत पालिकेने तात्काळ त्याबाबत परिवर्तन करावं अन्यथा अनेक रक्तबंबळ माणसांचे रक्त वाया जाऊन प्रशासनास कारणीभूत ठरवून उद्या जर काही घटना विघटित घडली तर यास पालिका जबाबदार निश्चित असेल त्यामुळे पालिकेने आपल्या रस्तेला असलेले खड्डे बरेचसे बुजवलेत पण जे बाकी बुजवणे आहे त्याबाबत लक्ष केंद्रित करणे अति महत्वपूर्ण आहे कारण ही माहिती मला माझीच मित्र पत्रकार आहेत त्यांनी दिली तिथली परिस्थिती बघताना मला सुद्धा उघड वाटले की या ठिकाणी जर पत्रकार बांधवांना वास्तव दिसत असताना प्रशासन जर त्या ठिकाणी योग्य बदल करत नसेल तर मला वाटतं या ठिकाणी प्रशासन कुठेतरी कमी पडत आहे आणि याकडे त्वरित लक्ष केंद्रित करून हे खड्डे बुजवावे हीच आग्रही पोलिसांची पत्रकारांची आणि जनतेची मागणी आहे त्याची निश्चित आपण पूर्तता कराल अशी आशा सर्व जनता आपल्यापाशी व्यक्त करत आहे.

23
5735 views