logo

मोस्ट ऑन्टेड, दरोडेखोरास इंदापूर पोलिसांनी सापळा रचून केली अटक ; त्याच्याकडील नऊ गावठी बॉम्बसह तिन पिस्टल व अन्य शस्त्र घेतली पोलिसांनी ताब्यात..!!!

पुणे विभागीय संपादक- संजय चांदगुडे

टीव्हीवर आणि चित्रपटात शोभतील असे बॉम्ब प्रत्यक्षात पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलिसांनी दरोडेखोराकडून ताब्यात घेतले आहेत त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.या प्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे. सुयश ऊर्फ तात्या सोमनाथ घोडके,वय २३ वर्षे,राहणार कळंब तालुका इंदापुर जिल्हा पुणे असं आरोपीचं नांव आहे.याबाबत आता वालचंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

वालचंदनगर पोलिसांनी एक-दोन नव्हे तर तब्बल नऊ बॉम्ब तीन पिस्टल आणि तलवारी कोयते घेऊन दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगाराला वेळीच सापळा रचून त्याच्या मुस्क्या आवळल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार यांनी माध्यमांसमोर दिली आहे.


वालचंदनगर पोलिसांनी ऐन गणपती व ईद-ए-मिलादच्या मुहूर्तावर केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.


आरोपी सुयश ऊर्फ तात्या सोमनाथ घोडके रा. कळंब याचा वालचंदनगर पोलीस शोध घेत होते.तो वालचंदनगर येथील अंजली बाल मंदीर क्रमांक ०१ येथील कामगार वसाहतीच्या पोस्ट कॉलनी डी - 3 मधील खोली क्रमांक 03 मध्ये त्याच्या मित्रांसोबत असल्याची बातमी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वालचंदनगर पोलिस ठाण्यातील पो.हवा स्वामी, पो.हवा काटकर, पो.हवा बनसोडे,पो.काँ. चितकोटे, पो.काँ.चोपणे, पो.काँ.सोनावणे, म.पो.काँ.कर्दिक यांच्या पथकाने बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड,वालचंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा.पो. निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी सापळा लावला आणि सदर आरोपीला ताब्यात घेतले.

यात पोलिसांनी त्यांच्याकडून 3 गावठी पिस्टल मॅग्झीन सहीत एक खाली मॅग्झीन,दहा जिवंत काडतुसे (राऊंड),चौदा वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, दोन लोखंडी कटर,एक लोखंडी तलवार,दोन लोखंडी चाकु, एक मुठ नसलेली तलवारीचे पाते आणि 9 सुतळी बॉम्ब इत्यादी मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

309
12924 views