logo

छत्रपती संभाजीनगर- अहिल्यादेवी नगर- पुणे रस्ता होणार चकचकीत! 2 हजार कोटीतून होणार नूतनीकरण

सनाच्या माध्यमातून अनेक रस्त्यांचे नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यातीलच एक महत्त्वाचा मार्ग बघितला तर तो छत्रपती संभाजी नगर येथून अहिल्यादेवी नगर मार्ग पुणे या ठिकाणी जाणारा मार्ग देखील महत्त्वाचा आहे व या महामार्गाचे देखील आता नूतनीकरण करण्यात येणार आहे. राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांना जोडणारे जे काही महामार्ग आहेत त्यातील बऱ्याच महामार्गांची अवस्था सध्या बिकट झालेली आहे. अनेक महत्त्वाच्या मार्गांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने प्रवाशांना खूप मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते व अशा रस्त्यांवर अपघाताचे प्रमाण देखील वाढल्याचे चित्र आहे.त्यामुळे शासनाच्या माध्यमातून अनेक रस्त्यांचे नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यातीलच एक महत्त्वाचा मार्ग बघितला तर तो छत्रपती संभाजी नगर येथून अहिल्यादेवी नगर मार्ग पुणे या ठिकाणी जाणारा मार्ग देखील महत्त्वाचा आहे व या महामार्गाचे देखील आता नूतनीकरण करण्यात येणार आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात हा महामार्ग चकचकीत होऊन छत्रपती संभाजी नगर व अहिल्यादेवी नगर मार्गे पुणे जाणाऱ्या प्रवाशांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.

छत्रपती संभाजीनगर ते पुणे या महामार्गाचे होणार नुतनीकरण

याबाबत सविस्तर वृत्त असे की, छत्रपती संभाजी नगर- अहिल्यादेवी नगर मार्गे पुणे या विद्यमान मार्गाचे नूतनीकरण करण्यात येणार असून याकरिता 2000 कोटी 50 लाख रुपये खर्च येणार आहे. सध्या जर या मार्गाची स्थिती पाहिली तर या ठिकाणी कार वगळता इतर वाहनांकडून टोल वसुली केली जात असून ती टोल वसुली संपताच हा मार्ग महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे व त्यानंतर या महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय देखील गुरुवारी शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे.इतकेच नाही तर या मार्गावरील पुणे ते शिरूर हा 53 किमीचा मार्ग सहा पदरी करण्यात येणार असून एमआयडीसी मार्फत हे काम केले जाणार आहे. या कामाकरिता तब्बल सात हजार 515 कोटीचा खर्च अपेक्षित आहे.

तसेच शिरूर ते अहिल्यादेवी नगर बाह्य वळण रस्त्या मार्गे छत्रपती संभाजीनगर हा जो काही जुना रस्ता आहे तो सुधारण्यासाठी 2050 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

हे मार्ग केव्हा केले जातील एमआयडीसीकडे हस्तांतरित?

सध्या जर आपण बघितले तर शिरूर ते अहमदनगर या मार्गामध्ये पीडब्ल्यूडी अर्थात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पथकर वसुली होत आहे व ही पथकर वसुली जेव्हा संपेल तेव्हा हा मार्ग एमआईडीसीला हस्तांतरित करण्यात येणार आहे.

तसेच अहिल्यादेवी नगर ते देवगड रस्त्याची सुधारणा करण्यासाठी हा रस्ता देखील एमआईडीसीला हस्तांतरित करण्यात येणार आहे व देवगड ते छत्रपती संभाजी नगर या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून टोल वसुली सुरू आहे. ती संपुष्टात आल्यानंतर हा मार्ग देखील एमआईडीसीला हस्तांतरित करण्यात येणार आहे.

31
14135 views