logo

साक्षरता अभियाना अंतर्गत नूतन ज्ञान मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अडावद ची साक्षरता जनजागृती प्रभात फेरी

अडावद ता चोपडा येथील नूतन ज्ञान मंदिर विद्यालयात शासनाच्या परिपत्रकानुसार 1 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर पर्यंत संपूर्ण राज्यात नवभारत साक्षरता अभियान आयोजित केले आहे. या अभियाना अंतर्गत दिनांक 3 सप्टेंबर रोजी इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकडून अडावद गावात प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी हातात बॅनर्स घेऊन शिक्षणाचे महत्त्व, जन जन साक्षर, साक्षरतेकडून समृद्धीकडे, वाचाल तर वाचाल, शिकेल तो टिकेल, यासारख्या घोषणा देऊन संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढली. विद्यार्थ्यांच्या घोषणांनी गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. आजही समाजात शिक्षणाविषयी उदासीनता दिसून येते. याविषयी जनजागृती करण्यात आली. शिक्षणाकडून समृद्धीकडे नेण्याचा मुख्य मार्ग म्हणजे शिक्षण होय. हे या प्रभात फेरीच्या माध्यमातून समाजात संदेश देण्यात आला. प्रभात फेरीसाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री आर जे पवार सर, उपप्राचार्य श्री एस के भंगाळे सर, पर्यवेक्षक श्री के आर कणखरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री बी के साळुंखे सर, श्री बीपी महाजन सर, श्री एम पी तायडे सर, श्री डी एम सोनवणे सर यांनी परिश्रम घेतले. सर्व शिक्षक शिक्षण तर बंधू भगिनी यांचे सहकार्य मिळाले.

28
3261 views