logo

विषय - आरोग्य क्षेत्रात खळबळ की बेजाबदारी

विषय - आरोग्य क्षेत्रात खळबळ की बेजाबदारी
मांडवगण फराटा 4/09//2024 रोजी आज ह्या गावात जवळ जवळ 15 ते 20 हजार लोकसंख्या असलेले गाव आहे.चार ते पाच गावाचे केंद्र बिंदू आहे.तसेच शिक्षणासाठी सर्व प्रकारच्या सोई उपलब्ध आहे.जवळच पाटस रेल्वे स्टेशन आहे.ह्यामुळे येथे सर्व सोई राहण्या योग्य असल्याने बाहेरील लोक येथे कायमस्वरूपी राहत आहे.कायमच वर्दळीचा रस्ता असल्याने गर्दीही असते.बाहेरील व सर्व विध्यार्थी साठी सुद्धा मेडिकल कॉलेज उपलब्ध आहेत.ह्यामुळे या गावाचे नाव पंच कृषित निघते.भीमा नदीचे बारा महिने पाणी असल्याने शेती व्यवसाय मुख्य आहे.म्हणून गावाच्या चारही बाजूंनी हिरवे गार शालू पसरला आहे.
जास्त लोकसंख्या असलेल्या कामही जास्त आहे.जास्त लोकसख्या असल्याने येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सरकारने उपलब्ध करून सेवे साठी दिले आहे.आसपासच्या गोड गरीब सर्व साठी विशेष डिलिव्हरी साठी पसंतीस उतरले आहे.योग्य सेवा ह्या आरोग्य केंद्रातून जनतेला मिळावे असे प्रयत्न चालू असते.
कमतरता मनुष्य बाळाची
गावाची लोकसंख्या पाहता आरोग्य सेवा ही मोठी असणार.पण गेल्या चार ते पाच वर्षापासून कायमस्वरूपी परिचारिका येथे भरलेली नाही.ह्यामुळे कोठे तरी सेवा कमी पडताना दिसत आहे.गाव मोठे लोकसंख्या जास्त पण त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात स्टाफ कमी.
ह्या मोठ्या गावाचे काम करण्यासाठी NRHM कंत्राटी परिचारिका नेमलेली आहे.काम जास्त असल्याने NRHM कंत्राटी परिचारिका यांची पोस्ट दुसऱ्या गावाची असताना त्या ह्या गावात काम पहावे लागते.ह्यामुळे आरोग्य काम कोठेतरी कमी पण जाणवते
तसेच शासनाने कंत्राटी परिचारिका मुख्यालयातही दिले आहे . त्यांनाही ओपीडी चे काम असताना दुसरे पदाचे काम बळजबरीने ऑफिस लेटर देऊन करण्यास भाग पाडत आहे.
* प्राथमिक आरोग्य केंद्राची वेळ
* ओपीडी ची वेळ सकाळी 8:,30 am असते.पण प्रत्यक्ष वेळ उशिराच असते.ठरून दिलेल्या वेळेत कर्मचारी योग्य वेळी उपलब्ध असते.
* पण प्राथमिक आरोग्य केंद्रात कित्येक वेळी डॉक्टर वेळेत उपलब्ध नसतात.वेळेवर ओपीडी सुरू होत नाही.यामुळे गर्दी होतच राहते. कर्मचाऱ्यांना वेळेवर जेवणही करता येत नाही.ह्याकडे शासनाने विशेष लक्ष द्यावे.अशी नागरिकांची ओरड होत आहे.
* तक्रार पेटी
प्राथमिक आरोग्य केंद्रात तक्रार पेटी असावी.ज्याने करून काही रूग्णांना तक्रार करता येईल.त्याचा आढावा दर महिन्याला मीटिंग मध्ये घ्यावा ज्याने करून सेवा चांगली देता येईल.
* प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाईची कमतरता
कित्येक महिन्यांपासून मांडवगण फराटा प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच शिपाई आहे.ते सुद्धा बाहेरून येऊन जाऊन करतायेत.
मुख्यालयात तीन शिपाई कायमस्वरूपी पदावर असतात.पण प्रत्यक्षात एकच शिपाई काम पाहत आहे.दोन शिपाई सेवेतून निवृत्त झाले आहे.ना त्यांच्या जागी कंत्राटी किंव्हा कायमस्वरूपी शिपाई भरले नाही. निवास्थान उपलब्ध असतानाही कायमस्वरूपी शिपाई येते राहत नाही.यामुळे त्यांचे काम परिचारिका करीत आहे.रात्रीची लाईट लावणे.दार लावणे.सकाळी उघडणे.इत्यादी कामे आता परिचारिका पाहत आहे.याकडे शासनाने लक्ष द्यावे अशी रुग्णांकडून विनंती होत आहे.
तसेच परिचारिका मधूनही नाराजी होत आहे.उघड पणे कोणीही बोलत नाही होणाऱ्या कारावही साठी घाबरत आहे.
* वैद्यकीय निवस्थान
वैद्यकीय अधिकारी यांनी चोवीस तास सेवा द्यावी म्हणून शासनाने वैद्यकीय साठी निवासस्थान बांधले आहे.पण ते आता ना दुरुस्ती मध्ये आहेत.कित्येक वेळी विनंती करूनही निवासस्थान नादुरुस्त अवस्थेत आहे.कित्येक दिवसांपासून वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात राहत आहे.याकडे शासनाने लक्ष देऊन निवासस्थान दुरुस्त करून द्यावे.
* प्राथमिक आरोग्य केंद्राची आजूबाजूची स्वच्छता
पावसाचे दिवस चालू आहेत.चिखल होत आहे.तसेच गवतही वाढत आहे.यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अवती भवती गवत वाढलेले दिसत आहे.तसेच ना दुरुस्त निवासस्थान.कर्मचारी निवासस्थान यांच्याही आजूबाजूला गवत वाढले आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी स्वचछता निधीतून फंड उपलब्ध करून स्वच्छ करावे. ज्याने करून डासांचा प्रादुर्भाव होणार नाही.
Night shift ( रात्रीचे काम )
प्राथमिक आरोग्य ही सेवा 24 तास उपलब्ध असते. दिवसाही व रात्रीही निकडीच्या प्रसंगासाठी 24 तास सेवा असते.पण ह्या केंद्रात दिवस शिपाई असतात.पण रात्री ना शिपाई ना वॉचमन अशा वेळी महिला परिचारिका यांनी जीव मुठीत धरून सेवा कशी करावी.दार उघडण्यापासून ते लवण्यापासून रात्री परिचारिका काम करीत आहे.
रात्री सेवा देत असताना त्याच्या बरोबर काही घडले तर यांची जबाबदारी कोण घेईल.रात्रीचे काम .बंद करावे अशी मागणी होत आहे.रात्री शिपाई द्या.वॉचमन असावे अशी मागणी होत आहे.ह्या कडे ग्रामपंचायत. शासनाने लक्ष द्यावे अशी विनंती होत आहे.

17
3552 views