करमाळा आगारातील गाड्यांची दुरावस्था!
करमाळा आगाराची अवस्था खूप बिकट झाली असून कित्येक वर्ष त्याच गाड्या पासिंग करून वापरत असून त्या गाड्या स्क्रॅपच्या लेवलच्या गाड्या करमाळा तालुक्यात वापरत आहेत. पुण्याला जायचं मनल की गाडी व्यवस्थित पुण्याला जाईल का नाही याची शाश्वतीच येत नाही. कर्मचारी पण गाड्यांना खूप वैतागले असून त्यांना ते म्हणतात काय करणार विभागातूनच गाड्या आम्हाला मिळत नाहीत नवीन गाडी अजून पर्यंत कित्येक दिवस झालं मिळाली नाही त्यामुळे आम्ही तर काय करणार असे त्यांचे उत्तर ऐकावं लागतं. वरून काही गाड्यांचे सायलेन्सर फुटलेले असल्याने त्यांना पुण्यापर्यंत जाताना खूप त्रास व काम बधिर होत असल्याने वयस्कर माणसांना खूप त्रास होत आहे पण पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे एसटीनेच प्रवास करावा लागतो हे मोठा दुर्दैव करमाळा आगाराचा आहे. यासाठी सोलापूर विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे जातीने लक्ष द्यावे व याची दखल घ्यावी.