व्हॅल्यूओ इंडिया कंपनी कामगारांचे काळ्या फिती बांधून आंदोलन...
"औद्योगिक क्षेत्रात कामगारांची अवहेलना.."काम करून घेऊन कंपनी वेळेवर पगारवाढ करत नसल्याने या महागाईच्या काळामध्ये कामगारांचे जगणे मुश्कील झाले आहे, कामगारांच्या जीवावर कंपन्या मोठे होत आहेत व आपली घरे कशी भरतील याकडेच लक्ष देत आहेत"व्यवस्थापन तुपाशी व कामगार उपाशी" अशी परिस्तिथी सर्वत्र निर्माण झाली आहे ..अशा परिस्तिथी मध्ये कामगार संघटनांनी कामगारांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहेत,कामगारांना भरीव पगारवाढ न मिळाल्यास आंदोलनात बदल करण्यात येईल तसेच आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल - श्री संतोष (आण्णा) बेंद्रे , अध्यक्ष शिवगर्जना कामगार संघटना महाराष्ट्र पुणे : लोणीकंद, पुणे येथील व्हॅलिओ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मध्ये शिवगर्जना कामगार संघटना कार्यरत असून कंपनी व्यवस्थापन आणि शिवगर्जना कामगार संघटना यांच्यामध्ये जुलै २०२३ पासून कामगाराच्या वेतनवाढ व सेवा शर्तीबाबत बोलणी सुरू आहे. मागील १३ महिन्यापासून कामगारांचा वेतनवाढ करार प्रलंबित असून व्यवस्थापनाच्या आडमुठेपणामुळे व वेगवेगळे कारणे समोर करून सदरील करार होण्यास विलंब करत असल्याने कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात दि.२८ ऑगस्ट २०२४ पासुन सर्व कामगारांनी डोक्याला काळ्या फिती बांधुन बेमुदत जाहिर निषेध नोंदविला आहे. कामगारांनी कंपनी मॅनेजमेंटचा जाहीर निषेध करत जोरदार घोषनाबाजी केली.