logo

तळोजा फेज 2 बस थांब्याच्या समोर असलेल्या पंक्चर रिपेअरिंगच्या दुकानांमुळे रोज संध्याकाळी तिथे वाहतूक कोंडी होते. यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त आहे

तळोजा फेज 2 बस थांब्याच्या समोर असलेल्या पंक्चर रिपेअरिंगच्या दुकानांमुळे आणि अनधिकृतपणे टाकलेल्या इतर दुकानांमुळे रोज संध्याकाळी तिथे वाहतूक कोंडी होते. यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त आहे. शिवाय, एनएमएमटी बससाठी थांबण्याची पुरेशी जागा उपलब्ध नसते. आसावरी गेटकडे येताना बहुतेक वेळा तिथे गाड्या उभ्या असतात, ज्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना अडचण होते. यावर काही उपाय करता येईल का?

तसेच, तिथे उभ्या असलेल्या गाड्यांमुळे आसावरी साईड कडून येणाऱ्या गाड्या दिसत नाहीत, ज्यामुळे दुर्घटनेची शक्यता अधिक आहे. यावर आपण काही करू शकतो का?

काल-परवा सिडकोच्या अतिक्रमण विभागाने तिथल्या सर्व दुकान हटवले असले तरी, त्यामुळे रस्ता खूप मोकळा झाला आहे. परंतु, हे कायमस्वरूपी नसणार आणि तिथे पुन्हा अनधिकृत दुकानं उभारली जातील. या समस्येवर आपण काही ठोस उपाय करू शकतो का? कृपया यावर आपली प्रतिक्रिया द्यावी.

0
2046 views