महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ, मराठवाड्यात अक्षरश: थैमान, अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट, नागरिकांनो काळजी घ्या
मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस पडतोय. विशेष म्हणजे मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. तसेच प्रशासनही संभाव्य परिस्थिती लक्षात घेता सर्व काळजी घेत आहे.महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. विशेषत: मराठवाड्यात प्रचंड पाऊस पडतोय. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात पुढचे चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासासांठी मराठवडा, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा हा धुमाकूळ मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही असण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर उद्याही कायम असण्याची शक्यता आहे. या पावसाची तीव्रता 4 सप्टेंबरपासून कमी होण्याची शक्यता असल्याची माहिती के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे.यवतमाळमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊसयवतमाळ जिल्ह्यातील पुसद या ठिकाणी ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसाने वडसद या नाल्याला पूर आला आहे. पुरामुळे नाल्याने रौद्र रूप धारण केले होते. या पुरात या भागातील शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. काही घरात पुराचे पाणी सुद्धा शिरले होते. यावेळी नाल्या लगतच्या एका घरात पाणी शिरले. या घरातील 3 जण या पुरात अडकले होते. यावेळी आमदार इंद्रनील नाईक यांनी तात्काळ यंत्रणा बोलवून अडकलेल्या तीनही जणांना रेस्क्यू करुन वाचवले.जळगावच्या मुक्ताईनगरमध्येही मुसळधार पाऊसजळगावच्या मुक्ताईनगरमध्येही मुसळधार पाऊस पडला आहे. आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर विजेच्या कडकडाटांसह मुक्ताईनगर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर उष्णतेपासून हैरान झालेल्या नागरिकांना देखील मोठा दिलासा मिळाला आहेबीडमध्येबी मुसळधार पाऊसबीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात 24 तासांपासून पावसाची संततधार सुरु असल्याने नागापूर धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आबे. संततधार पावसामुळे परळी शहरासह 15 गावांना पाणी पुरवणारे नागापूर धरण ओसंडून वाहत आहे. धरणातील पाणी वाण नदीपत्रात सोडल्यामुळे नदीचे पाणीही ओसंडून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.