logo

भाजयुमोचे नुतन प्रदेशाध्यक्ष मा. अनुपजी मोरे यांचा मा. ऋषिकेशदादा कराड यांच्याकडून यथोचित सत्कार*

*भाजयुमोचे नुतन प्रदेशाध्यक्ष मा. अनुपजी मोरे यांचा मा. ऋषिकेशदादा कराड यांच्याकडून यथोचित सत्कार*
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष मा.श्री अनुपदादा मोरे लातूर दौऱ्यावर आले असता त्यांनी भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या संवाद संपर्क कार्यालयास भेट दिली असता त्यांचा भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष ऋषिकेशदादा कराड यांनी पांडुरंगाची मूर्ती भेट देऊन यथोचित सत्कार केला.
यावेळी युवकांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर नूतन प्रदेशाध्यक्ष मा. अनुपदादा मोरे यांनी ऋषिकेशदादा कराड यांच्यासह उपस्थित तरुणासोबत चर्चा केली. तसेच नव मतदार अभियान व युवा वॉरियर्स शाखांना मतदार संघातील अधिकाधिक युवकांना जोडण्याचे आवाहन करून आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जिल्ह्यातील विविध जातींमधील युवकांच्या बैठकांचे आयोजन करण्याबाबत नियोजन करण्यात आले.
यावेळी मराठवाड्याचे समन्वयक अरुणजी पाठक, प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील काव्हेकर, युवा मोर्चा प्रदेश सचिव कुणाल मराठे, लातूर जिल्ह्याचे युवा मोर्चा अध्यक्ष अमोल निडवदे, जिल्हा सरचिटणीस सुरज शिंदे, रेणापूर तालुका अध्यक्ष अमर चव्हाण, लातूर तालुका अध्यक्ष संजय ठाकूर पाटील यांच्यासह लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

4
1938 views