logo

काशिलिंगेश्वर नगर ग्रामपंचायत मधील ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप तोच चौकशी समिती मध्ये सहभागी

लातूर -काशिलिंगेश्वर नगर ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्तेच्या बेकायदेशीर नोंदी व विकास कामांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून कार्यवाही करणे बाबत लातूर जिल्हा परिषदेचे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिनांक २२/८/२४ रोजी निवेदन सादर करण्यात आले होते. परंतु सदर प्रकरणी मा.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत अतिशय चुकीचा व आश्चर्य व्यक्त करणारा आदेश काढण्यात आला आहे.परंतु काशिलिंगेश्वर ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसेवक यांच्यावर रहस्यमय शक्ती आहे काय आणि ती कोणाची आहे .या मागच कारण आणखीन अद्यापीसमोर आलेले नाही

सदर प्रकरणी ज्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे त्यांनाच सदर प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढले आहेत.त्यांनी काढलेल्या आदेशाबद्दल नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.

या विरोधात नागरिकांनी आता मा.जिल्हाधिकारी मॅडम यांच्या कडे निवेदन सादर केले आहे. सदर प्रकरणी आता जिल्हाधिकारी मॅडम यांनी सदर आदेश रद्द करुन दुसऱ्या अधिका-यांची चौकशी समिती नेमण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. याबाबत आज काशिलिंगेश्वर नगर ग्रामपंचायत मधील नागरिकांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती व या पत्रकार परिषदेत ग्रामस्थांनी आपली बाजू मांडली. सदर पत्रकार परिषदेस‌ ॲड.किरण बडे, ॲड.प्रभाकर केदार, विष्णू शिंदे, महादेव जमादार, ॲड.सतिष धायगुडे, भास्कर लहाने, सदाशिव नागरगोजे, काळे साहेब, उदय गोजमगुंडे, आकाश जमादार, इरफान शेख, वसीम पठाण, प्रकाश शिंदे, माधव येनाकफळे आदींसह इतर नागरिक उपस्थित होते.

25
6616 views