logo

अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शाळांना २ लाख रू. पर्यंत अनुदान

शकील खान/अकोला -: धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी २ लाख रू. पर्यंत अनुदान दिले जाते. इच्छुक शाळांनी अनुदानासाठी प्रस्ताव दि. 15 सप्टेंबरपूर्वी द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.
शासनमान्य खासगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगर परिषद शाळा व अपंग शाळांमध्ये सन 2024-25 या वर्षासाठी अनुदान वितरणासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. इच्छुक शाळांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन कार्यालय येथे दि. 15 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

शासनमान्यता प्राप्त खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, नगरपालिका, नगर परिषद शाळा, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अल्पसंख्याक समाजाचे (मुस्लिम, बौध्द, ख्रिश्चन, जैन, शीख, पारशी व ज्यू) किमान 70 टक्के विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे. अपंगांच्या शाळांमध्ये किमान 50 टक्के अल्पसंख्याक विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे.

शाळेच्या इमारतीचे नुतनीकरण व डागडुजी, ग्रंथालय अद्ययावत करणे, संगणक कक्ष उभारणे तसेच अद्ययावत करणे, शैक्षणिक कार्यालयासाठी आवश्यक फर्निचर, इन्व्हर्टरची सुविधा निर्माण करणे, अध्ययनातील साधने जसे लर्निंग मटेरियल, एलसीडी प्रोजेक्टर, अध्ययनासाठी लागणारे विविध सॉफ्टवेअर, इंग्रजी लॅग्वेज लॅब, शुध्द पेयजलाची व्यवस्था, प्रयोग शाळा उभारणे तथा अद्ययावत करणे, प्रसाधनगृह उभारणे तसेच डागडुजी करणे, झेरॉक्स मशीन, संगणक, हार्डवेअर तथा सॉफ्टवेअर या पायाभूत सुविधांचा अंतर्भाव आहे.

14
4684 views