logo

सदाशिवच्या काळात कशाला कात्री लागणार

महागणार..


चामोर्शी:
गणेशोत्सव अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणेशमूर्ती बनवण्यासाठी शहरातील मूर्तिकार व्यस्त झाले आहेत. दरम्यान, यंदा मूर्ती बनविण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांचे दरात प्रचंड वाढ झाल्याने गणेश बाप्पा च्या मूर्ती महागणार असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. गणेशमूर्ती घडविणारे मूर्तिकार आता बाप्पाच्या मूर्ती तयार करण्यात व्यस्त आहेत.


गणेशमूर्ती बनवणे ही एक कला आहे. राज्यात सर्वत्र पारंपरिक पद्धतीने मिळणारी चिकट माती, शाडू माती यांपासून गणेशाची मूर्ती घडवली जात आहे. मात्र, आता तयार पीओपीच्या मूर्ती वाड्यावस्त्यांवर येऊ लागल्याने या क्षेत्रात कलेला आर्थिक फटका बसला आहे. दरम्यान, यंदा मूर्ती बनविण्यासाठीलागणारे साहित्य महागल्याने आर्थिक फटका बसत आहे.


येत्या ०७ सप्टेंबर रोजी घरोघरी गणरायाचे आगमन होणार आहे. त्यामुळे शहरात गेल्या दोन महिन्यांपासून गणेशमूर्ती घडविण्यासाठी कारागिरांची मोठी लगबग सुरू आहे.


गणेशोत्सव जवळ आल्याने मूर्तिकार बाप्पांच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवत दोन महिन्यांपासून मूर्तीचे काम सुरू
गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यामुळे प्रत्येक गणेश मूर्तिकारांकडे किमान 100 ते 200 विविध आकारातल्या शाडू मातीच्या गणेशमूर्ती असतात. गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या आगमनाची आतुरता असते, त्याच प्रमाणे मूर्तिकारालाही किमान दोन महिने आधीपासून तयारी करावी लागत .


आहे. कच्चा माल महागल्यामुळे 25 टक्के गणेशमूर्तीचे दरही वाढणार आहेत.
बॉक्स:- साहित्याचे दर वाढले :
दरवर्षी माती, रंगाचे वाढलेले दर, तसेच सह कुटुंब व काम करणारे कारागीर यांची मेहनत करून गणेशमूर्ती मधून मिळणारी रक्कम याचा तांळ मेळच बसत नसल्याचे मूर्तिकार सांगत आहेत. मातीच्या मूर्तीची प्रमाणावर मागणी आहे. अनेक गणेश मंडळांनी मूर्तीची नोंदणी केली आहे. यावर्षी माती व रंगांच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे मूर्तीचे दरसुद्धा वाढणार आहे.



Oo. दिलीप कुनघाडकर मूर्तिकार, चांमोर्शी
गणपतीची मूर्ती तयार व्हायला घरातील कलाकारांचे हात राबत असतात. यात मूळ शिल्प घडवणारे, त्याचे साचे पाडणारे, मूर्ती करणारे, रंगकाम करणारे, डोळ्यांची आखणी करणारे अशा सोबतच मूर्तीना पॉलिश करणे, साधा रंग लावणे यापासून ते गणेशमूर्तीवर शेवटचा हात फिरवण्याची लगबग सुरू आहे.

2
3044 views