logo

एक नाही दोन नाही तीन ड्रोन ची दहशत

Topic एक नाही दोन नाही तीन तालुक्यात ड्रोनची दहशत

दिनांक 29/08/2024 मांडवगण फराटा.शिरूर गेल्या काही दिवसांत चोरी करणे हा हाय प्रोफेशनल व्यवसाय चोरांचा झाला आहे.आता चोर सुध्दा योजना आखून चोरी करीत आहे.त्यासाठी ते महागडे ड्रोन वापरून आजूबाजूची पारख करीत आहे.ह्यामुळे हे चोर गावंढळ नसावे.चांगले घराण्यातील शिकलेले असावे असे आपणास कळून येते.
शिरूरच्या पश्चिम भागात रात्रीच्या वेळी दहशत पसरली आहे.एकच भागात बऱ्याच वेळी चालता फिरता कॅमेरा फिरत आहे.
मागील काही दिवसांपासून खेड तालुक्यात पूर्व भागात ड्रोन फिरताना दिसत आहे.
दौंड तालुक्यातही पारगाव.चौफुला.केडगाव.ह्या भागातही ड्रोन फिरताना दिसत आहे.ह्या कारणाने नागरिक दहशत मध्ये आहेत. ड्रोन येतात कुठून आणि जातात कोठे हेच कळत नसून आजून नागरिक घाबरत आहे.
शिरूरच्या 11 गावात पश्चिम भागात शेलगाव बहुळा.वडगाव घेनंद असे अनेक वाड्या वस्तीमध्ये ड्रोन फिरताना दिसत आहे.काही भागातही छोटी मोठी चोरी होऊ लागली आहे
चोरीचे वाढते प्रमाण ह्यामुळे वातावरण भीतीचे निर्माण होऊ लागले आहे.रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्ती घालावी अशी मागणी सामान्य नागरिक करीत आहे.उलट पोलीस प्रशासन कडून नागरिकांनी घाबरून जाऊ नये अशी विनंती केली.

5
2823 views