logo

चार विनोदी नाटकांच्या पुस्तकांचे प्रकाशन

साहित्य भारती यु ट्यूब वाहिनी यांच्यावतीने श्री.प्रदीप तुंगारे लिखीत
१ देठ की हो हिरवा
२ थ्री अवर्स बिफोर डेथ
३ मिशन गीता
४ नातेवाईकांना बोलवा
ह्या चार विनोदी नाटकांचे प्रकाशन करण्यात आले. प्रसिद्ध चित्रपट आणि नाट्य अभिनेते श्री.विजय पटवर्धन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
देठ की हो हिरवा या नाटकाचे प्रयोग सुरू झाले आहेत. मिशन गीता या नाटकाचे प्रयोग लौकरच सुरू होतील. या सर्व नाटकांत कुठेही अश्लील विनोद नाही. निखळ कौटुंबिक विनोदी लेखन हे या नाटकांच्या संहितेचे वैशिष्ट्य आहे.

श्री विजय पटवर्धन यांनी नव्या संहितांची आणि मुख्यत्वेकरून विनोदी नाट्य संहितांची सध्याच्या काळात गरज असल्याचे विशद केले. एकाच वेळी चार विनोदी नाटकांची पुस्तके कलाकारां समोर येणे ही नाट्यरसिकांसाठी आनंदाची पर्वणी आहे असेही विजय पटवर्धन यांनी सांगितले. साहित्य भारती यु ट्युब वाहिनी यांनी सुरू केलेल्या उपक्रमाचेही विजय पटवर्धन यांनी कौतुक केले. लेखक प्रदीप तुंगारे यांनी विनोदी लेखन हे आबालवृद्ध सर्वांना आनंद देणारे असते तसेच लेखक फक्त शब्द लिहितो, कलाकार त्या शब्दांना जिवंतपणा आणतो असे सांगितले. साहित्य भारती यु ट्यूब वाहिनीचे संचालक श्री.चंद्रमोहन हंगेकर यांनी चांगल्या संहिता कलाकारांपर्यंत आणि कलाकारांकडून प्रेक्षकांच्या पर्यंत पोचल्या पाहिजेत यासाठी नाटकांची पुस्तके प्रकाशित करण्याचा संस्थेने उपक्रम हाती घेतला आहे असे नमूद केले. साहित्य भारती यु ट्युब वाहिनी तर्फे श्री. गिरीश सांगळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सुत्रसंचलन सौ. राधिका हंगेकर यांनी केले.

10
3706 views