logo

वाईट सवयी व वाईट विचारांची दहीहंडी फोडून केले विद्यार्थ्यांचे विचार शुद्धीकरण

एक अनोखी दहीहंडी

नूतन ज्ञान मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अडावद तालुका चोपडा जिल्हा जळगाव यात दरवर्षी दहीहंडी चा कार्यक्रम घेण्यात येतो. यावर्षी एक अनोखी दहीहंडी प्रोग्राम घेण्यात आला. त्यात दहीहंडी ही केवळ खाण्याचा प्रसाद देणे हा उद्देश नसून अनेक वाईट विचार, वाईट सवयी, शाळेत उशिरा येणे , खोटं बोलणे, गृहपाठ वेळेवर न करणे शाळेतून पळून जाणे व अभ्यास न करणे अशा वाईट गोष्टी या हंडीमध्ये टाकून अशी ही दहीहंडी विद्यार्थ्यांनी फोडून आपल्या मनातील वाईट विचार हे डोक्याबाहेर टाकले व नवीन चांगल्या शुद्ध विचारांचा संकल्प केला. यात इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला सहभाग घेतला. विद्यार्थी विद्यार्थिनींनी श्रीकृष्णाच्या गीतावर नृत्य केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पी डी चौधरी सर यांनी केले. शाळेचे उप मुख्याध्यापक श्रीमान एस के भंगाळे सर यांनी या हंडी मध्ये वाईट विचारांच्या चिठ्ठ्या यात टाकल्या व असे करू नये, असे विद्यार्थ्यांना सांगितले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डी एम सोनवणे सर एस यु पुराणिक सर एस डी पाटील सर एम व्ही पाटील सर यांनी विशेष सहकार्य केले.
तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनींनी सहकार्य केले.

33
4574 views