VSGGM तर्फे तेरा निशुल्क ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर चे डॉ हितेश पाटील यांच्या सहयोगाने VSGGM तर्फे निःशुल्क वितरण
विविध शहर और ग्राम गुजर ग्लोबल मंडळातर्फे प्रकाशा येथील सद्गुरू धर्मशाळेत झालेल्या कार्यक्रमात नंदुरबार परिसरातील १३ सेवाभावी संस्थांना ऑक्सिजन कॉन्सट्रेटरचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार दीपक गिरासे तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय सेवा संघांचे प्रमुख डॉ. बी. डी. पाटील, डॉ. प्रदीप पटेल, डॉ. वसंत पटेल, द्गुरू धर्मशाळेचे मोहन चौधरी, सरदार फाउंडेशनचे शीतलकुमार पटेल, एबीजीएमचे प्रमुख जगदीश पटेल, वनाधिकारी लक्ष्मण पाटील तसेच अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद चे माजी सदस्य रामचंद्र पाटील
आदी मान्यवर उपस्थित होते.
काळाची गरज ओळखून वैद्यकीय सेवा पुरविणारे हॉस्पिटल्स, सामाजिक काम करणाऱ्या विविध संस्थांना ऑक्सिजन कॉन्सट्रेटरचे निःशुल्क वितरण व्हीएसजीजीएमच्या सहयोगाने डॉ. हितेश पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भेट म्हणून हे मशिन्स उपलब्ध करून दिले.
यावेळी, नंदुरबार सहकार भारतीचे प्रमुख संदीप निकम, अजयजी शर्मा, विलास पाटील, व्ही. के. पटेल, अनामिका चौधरी, किशोर चौधरी, आदी उपस्थित होते.
ऑक्सिजन कॉन्सट्रेटरची सविस्तर माहिती डॉ. हितेश पाटील यांनी व्हिडीओ चित्रफीतद्वारे दिली.
तसेच तापी आरती सेवा संघ, धुरखेडा येथील वृक्षमित्र तथा ज्येष्ठ नागरिक, पत्रकार यांचाही सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.
तहसीलदार दीपक गिरासे म्हणाले की, व्हीएसजीजीएम ही सेवाभावी संघटना गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवेचे काम करीत आहे. धार्मिक ठिकाणीही स्वयंसेवक म्हणून ते काम करतात. वृक्षारोपण, रक्तदान, स्वच्छता अभियान,
सामुदायिक विवाह असे विविध सामाजिक उपक्रम कौतुकास्पद आहेत. कोरोना काळातही व्हीएसजीजीएमने उल्लेखनीय काम केले असून, आताही काळाची गरज ओळखून ऑक्सिजन कॉन्सट्रेटरचे वाटप केल्याचे त्यांनी सांगितले. जगदीश पटेल, डॉ. प्रदीप पटेल, अजय शर्मा, तुकाराम चित्ते, रामचंद्र पाटील, डॉ. बी. डी. पटेल यांनीही मनोगत व्यक्त केले.
श्री हेमंत पाटील यांनी सूत्रसंचालन तर प्रा हितेश पटेल यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी व्हीएसजीजीएमचे तथा स्नेहवर्धक मंडळ मुंबई च्या कार्यकारी मंडळ व परिसरातील तरुणांनी सहकार्य केले.
डॉ प्रशांत पाटील.
AIM News