एकलव्य आदिवासी संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री. सुधाकरराव वाघ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी २:०० वाजता पाचोरा शासकीय विश्रामगृह येथे बैठक संपन्न झाली.
आज दिनांक 24 ऑगस्ट 2024 वार शनिवार रोजी एकलव्य आदिवासी संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री. सुधाकरराव वाघ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी २:०० वाजता पाचोरा शासकीय विश्रामगृह येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये नवनिर्वाचित तालुका कमिटी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.श्री.गणेश नामदेव वाघ यांची तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली, तसेच प्रताप कृष्णा भील तालुका उपाध्यक्ष पदी, दत्तू अहिरे तालुका सचिव पदी, संतोष हिरामण महाले तालुका कार्य अध्यक्ष पदी, राजू कौतिक सोनवणे तालुका संघटक पदी, वसंत धुडकू भील तालुका संपर्कप्रमुख पदी ,बबन देवराव मोरे तालुका सल्लागार पदी, राजू गायकवाड तालुका खजिनदार पदी, ईश्वर गुलाब ठाकरे तालुका सहसंपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली. तसेच गणेश अशोक भील यांची युवा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. श्रावण रतन भील तालुका युवा संघटक पदी निवड करण्यात आली. सुनील रमेश सोनवणे यांची टायगर फोर्स तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली .राहुल सुरेश ठाकरे टायगर फोर्स तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सुरेश सखाराम ठाकरे यांची पाचोरा शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली .तसेच भडगाव येथील युवा कणखर नेतृत्व बापू मोरे यांची भडगाव टायगर फोर्स तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. प्रतिभा भाईदास पवार यांची महिला आघाडी तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली .अलकाबाई राजेंद्र मोरे महिला आघाडी तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.प्रवीण उत्तम गायकवाड यांची लोहटार खडकदेवळा गट प्रमुख पदी निवड करण्यात आली. भिकन कौतुक मोरे यांची लोहटारगणप्रमुख पदी निवड करण्यात आली. शालिक आत्माराम सोनवणे लोहारा गण प्रमुख पदी निवड करण्यात आली. बापू अमीर तडवी यांची पिंपळगाव हरेश्वर गटप्रमुख पदी निवड करण्यात आली. तुकाराम श्रावण महाले यांची नगरदेवळा गटप्रमुख पदी निवड करण्यात आली .गोविंदा महारू सोनवणे ययांची नगरदेवळा गणप्रमुख पदी निवड करण्यात आली .यावेळी उपस्थित असलेले एकलव्य आदिवासी संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री. सुधाकरराव वाघ साहेब व जिल्हा कार्याध्यक्ष भगवानदादा सोनवणे व जिल्हाध्यक्ष श्री एकनाथ अहिरे साहेब यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या वेळी खडकदेवळा येथील घटनेतील पिडीत कुटुंब यांना न्याय मिळवून देण्यासाठी एकलव्य आदिवासीं संघटनच्यावतीने पाचोरा प्रांत अधिकारी व पाचोरा डी. वाय.एस.पी.यांना निवेदन देण्यात येईल असे सांगितले. या वेळी प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.