logo

गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे चार गाईंची कत्तलीपासून सुटका

शिरूर प्रतिनिधी - गुरुवार दि. २२ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री ११ वा सुमारास राहू येथून MH 42 AQ 1965 या पिकअप वाहनामध्ये ४ गोवंश अतिशय क्रूरपणे वेदना होतील अशा पद्धतीने त्यांना खाली पाडून त्यांचे पाय दोरीने बांधून दाटीवाटीने कोंबून चारा पाण्याची व औषध उपचाराची सोय न करता मांडवगण मार्गे खडकत येथे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची खात्रीशीर माहिती गोरक्षक अहिरेश्वर जगताप यांना मिळाली त्यांनी माहिती मिळताच मांडवगण फराटा येथील गोरक्षक अमोल चौगुले यांना संपर्क करून सविस्तर माहिती दिली. चौगुले यांनी मांडवगण पोलीस व स्थानिक गोरक्षक संपत फराटे, मिनीनाथ गव्हाणे, मचिंद्र चौगुले, ऋतिक चव्हाण, अक्षय धारकर, उमेश पवार, राहुल गि-हे, यांना सोबत घेऊन खबर मिळालेल्या क्रमांकाचे पिकअप वाहन मांडवगण हद्दीमध्ये थांबवून पाठीमागील हौद्यामध्ये पाहिले असता चार गोवंश खाली पाडून क्रूरपणे डांबून ठेवल्याचे दिसून आले. मांडवगण पोलिसांनी पिकअप वाहनासह गोवंश ताब्यात घेऊन अमोल चौगुले यांच्या फिर्यादीवरून ओमकार लबाडे रा. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर, सराईत गोतस्कर ओमकार दशरथ सायकर रा. राहू ता. दौंड जि. पुणे, यांच्यावर महाराष्ट्र पशुसंरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून सर्व गोवंश बोरमलनाथ गोशाळा (चौफुला) केडगाव येथे सुखरूप सोडण्यात आले.

8
4508 views