logo

पुण्यातील निगडी येथे अल्पवयीन मुलीवर शिक्षकाचा विनयभंग..!

https://youtu.be/3Bo7a5IgoLI?si=QEKZBYQ_lJ_s_7j5

निगडी, दि. २४ (महाराष्ट्र मंथन):- बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच निगडी येथील एका नामांकित शाळेत सन २०२२ ते दि. २१/०८/२०२४ रोजीचे दरम्यान वेळोवेळी विदयालयाचे अवारामध्ये एका ११ वर्षांच्या विद्यार्थिनीस लैंगिक त्रास दिल्याबद्दल भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७४, ७८,७९,३५१ (२), ११५(२),१३ सह बालकांचे लैंगीक अपराधापासुन संरक्षण अधि कलम ७, ८, ९ (f), ९ (I), (m), ९ (t),१०,११,१२,१६,१७,१९ सह अनुसुचीत जाती आणि अनुसुचीत जमाती अत्याचार प्रतिबंध अधि कलम ३ (१) (W) (i) (ii), ३(२) (VA) अंतर्गत निगडी पोलिसांनी अटक केली आहे.
अटक केलेल्या आरोपींची नावे पुढील प्रमाणे १) हनुमंत दादानिकम वय ६५ वर्षे, रा. प्रधारमंत्री आवास योजना, बिल्डींग सी, रुम नं १२०५, बो-हाडे वाडी, मोशी, पुणे. २) अशोक सोपान जाधव वय ५३ वर्षे, रा. से नं १६, प्लॉट नं ९०/०८, राजे शिवाजीनगर, प्राधिकरण चिखली, पुणे. ३) गोरख सोपान जाधव वय ५० वर्षे, रा. से नं १६, प्लॉट नं ९०/०८,राजे शिवाजी नगर,चिखली, प्राधिकरण, चिखली, पुणे ४) अविंद्र अंकुश निकम वय ३६ वर्षे, रा. सर्व्हे नं १६, प्लॉट नं ३५,, राजे शिवाजी नगर, चिखली, प्राधिकरण, चिखली, पुणे. ५) रोहिदास बलभिम जाधव वय ६३ वर्षे, रा. करण पॅराडाईज, रुम नं ४०५, पिंपळे गुरव, पुणे. ६) निवृत्ती देवराम काळभोर वय ५६ वर्षे, रा. साई हौसिंग सोसायटी, रुम नं १३२/५, गुरुव्दारा चौक, चिंचवड, पुणे. ७) हनुमंत दादानिकम, ८) शुभांगी अशोक जाधव अशी आहेत. यापैकी आरोपी क्र १ ते ६ अटक आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार आरोपी निवृत्ती देवराम काळभोर वय ५६ वर्षे, रा. साई हौसिंग सोसायटी, रुम नं १३२/५, गुरुव्दारा चौक, चिंचवड, पुणे हा फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी वय ११ वर्षे, १० महिने हिला वारंवार लैंगीक त्रास देत होता आणि झाला प्रकार कोणाला सांगितला तर तुला लय मारीन, अशी धमकी देत असे. तसेच आरोपी हा पिडीत मुलीचे वर्गातील विदयार्थ्यांना पिटीचे क्लास साठी ग्रांउडवर घेवून जात व येत असताना पिडीत मुलीचे कंबरेला हात लावुन पाठीवर हात फिरवत असे. तसेच पिडीत मुलगी ही वॉशरूमकडे जाताना तिचे पाठीमागे जावुन तिला मी पणतुझ्यासोबत वॉशरूम मध्ये येवू का असे बोलून पिडीत मुलगी ही वॉशरूमचे बाहेर येईपर्यत वॉशरूमचे बाहेर उभा रहायचा व ती बाहेर आली की तिचे पाठीवरून हात फिरवत असे. तसेच दिनांक २१/०८/२०२४ रोजीही पिडीत मुलगी ही वॉशरुमला गेली असता वॉशरूम वरून बाहेर आली. त्यावेळी आरोपी याने तिचे जवळ जावुन तिचे पाठीवरुन व कमरेवरून हात फिरवुन तिला एक पप्पी दे असे कन्नडमध्ये म्हणत विनयभंग केला.
तसेच आरोपी निवृत्ती काळभोर याचेविरुध्द निगडी पोलीस ठाणे येथे गु. रजि नंबर ८२७/२०१८ भादविकलम ३५४(अ) सह पॉक्सो अॅक्ट कलम ७, ८, १२ अन्वये दाखल असुन सदर गुन्हयामध्ये निवृत्ती काळभोर याला न्यायालयाने शिक्षा दिली आहे. तरीसुध्दा त्या शिक्षकाला शाळा व्यवस्थापनाने पुन्हा शाळेत नोकरी देत अशा वृत्तीच्या माणसाला शिक्षा झाली आहे हे माहित असतानादेखील शाळेत नोकरीवर पुन्हा घेणे हे एका पध्दतीने लैंगीक अत्याचाराच्या गुन्हयांना प्रोत्साहन दिल्यासारखे आहे. म्हणुन शिक्षकनिवृत्ती काळभोर, तसेच शाळेचे प्रिंसीपल अशोक जाधव, तसेच लि सोफियाइज्यु. सोसायटीपुणे रजिक्रं १४५९, ट्रस्ट एफ / २५५६ / पुणे या ट्रस्टचे अध्यक्ष रोहिदास बलभिम जाधव, लक्ष्मण नामदेव हेंद्रे, अविंद्र अंकुश निकम, गोरख सोपान जाधव, हनुमंत दादा निकम, आणि शुभांगी अशोक जाधव यांचे विरुध्द फिर्यादी यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलिस आयुक्त पाटील हे पुढील तपास करीत असल्याचे निगडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी संगितले.

17
6161 views