logo

सुलतान शिकलगार याची पाखरा आझाद केलं तुला या मराठी अल्बम साँग मधून फिल्म इंडस्ट्रीत उंच भरारी

सोलापूर, माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी गावच्या सुलतान शिकलगार या मुलाने संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच राज्य बाहेर धुमाकूळ घालत असलेल्या पाखरा आझाद केल तुला या गीतातून फिल्मी दुनियेत उंच भरारी घेतली आहे.या गीताचे 3 महिण्यात 5 कोटी 6 लाख views पूर्ण झाल्या आहेत आणि या गीताबद्दल लोकांचे प्रेम अजूनही कमी झालेल नाही असं दिसत आहे.
कला क्षेत्राची आवड असताना या मुलाने आपल्या कलेच्या जोरावर 3-4 वर्ष खडतर प्रवास करून अखेर पाखरा आझाद केल या गीतातून प्रसिद्धी मिळवली. तसेच या गीताबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की शूटिंग च्या वेळी कोणालाही असं वाटल न्हवत की या गीतातून एवढी प्रसिद्धी भेटेल.
या गीताचे गीतकार आशिष शिंदे असून सिंगर सुप्रसिद्ध गायक किशोर जावळे ( KK ) आहेत. त्यांचबरोबर या गीताचे निर्माते पवन घायतडक असून याच दिगदर्शन विघ्नेश सावंत यांनी केल आहे. व कॅमेरामन ऋषिकेश वारभोग आहेत. अभिनेता सुलतान शिकलगार यांच आगामी गीत तिच्या हातावर मेहंदीचा रंग लागला माझ्या संग नाही दुसऱ्याच्या संग लागला 25 ऑगस्ट ला एकता फिल्म प्रोडक्शन या यु-ट्यूब चॅनेल वरती प्रदर्शीत होणार आहे.

24
12907 views