logo

वाकडी -चितळी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये चिमुकला प्रथमेशचा दुर्दैवी अंत*

*वाकडी -चितळी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये चिमुकला प्रथमेशचा दुर्दैवी अंत*
अंगणात खेळत असलेल्या साडेतीन वर्ष वयाच्या चि. प्रथमेश मयूर वाघ चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला करून घरापासून सहाशे फूट अंतरावर फरफटत नेल्याने मुलाचा जागेवरच मृत्यू झाला. या खळबळजनक घटनेने गावावर शोककळा पसरली असून वनविभागाचा हलगर्जीपणा या बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने वनविभागा विषयी नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.चितळी ता. राहाता येथील मयूर दत्तात्रय वाघ याची वस्ती गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाकडी रोड काकडाई मंदिरा जवळ आहे. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अंगणात खेळत असलेला प्रथमेश मयूर वाघ या बालकांवर घरा शेजारी असलेल्या डाळींबाच्या बागेतून दबा धरून बसलेल्या बिबट्याने झेप घेत क्षणार्धात धूम ठोकली. बाहेर असलेल्या आजीने आरडाओरडा केल्यानंतर घरातील सर्व बिबट्याच्या दिशेने धावले. मात्र बिबट्या मिळून न आल्याने त्यांनी डाळींब व मका इतर ठिकाणी शोध घेतल्या नंतर घरापासून सहाशे फूट असलेल्या गिनीं गवतात रक्त भंबाळ अवस्थेत हा चिमुरडा मिळून आला. त्यांच्या मानेला मोठ्या प्रमाणात जखमा होऊन जागेवरच गतप्राण झाल्याचे प्रथम दर्शनी नागरिकांनी या वेळी सांगितले. यावेळी त्याला तातडीने पुढील उपचारासाठी श्रीरामपूर येथील कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टर यांनी मृत घोषित केले.

113
9779 views