
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून डॉ पूजा मैड यांनी केली मोफत आरोग्य तपासणी.
प्रतिनिधी पिंपरी निर्मळ दैनिक राष्ट्र सह्याद्री राहता तालुक्यातील पिंपरी निर्मळ चे स्वामी कृपा लॅब चे मालक चि. सागर घोरपडे व रुध्वी क्लीनिक च्या डॉ. पूजा मैड यांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्य दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर रुध्वी क्लीनिक डॉ. पुजा मैड तसेच स्वामी कृपा लॅब यांचे कडून रक्त तापसणी वर 50% सूट दिली . असा उपक्रम राबविण्यात आला होता. यासाठी संगमनेर मधील विविध भागातून जनतेने उत्तम असा प्रतिसाद दिला. सकाळी नऊ वाजल्या पासून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम अविरतपणे चालू होता. यात जास्तीत जास्त महिलांचा सहभाग पाहायला मिळाला. त्याचबरोबर विविध प्रकारच्या आजारावर देखील आरोग्य तपासणी शिबिर भरविण्यात आले होते. जसे की दमा, डायबिटीस अशा आजारांची देखील नागरिकांना माहिती दिली गेली. यासाठी जवळजवळ ७ नर्स स्टाफ हा काम करत होता .या संकल्पनेचे मुख्य डॉक्टर सौ. पूजा मैड यांनी जास्तीत जास्त लोकांना यात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याच धर्तीवर नागरिकांचा उत्तम असा प्रतिसाद पाहायला मिळाला. खरं तर आरोग्य ही आपली मूलभूत संपत्ती आहे आणि ती जपणे ही काळाची गरज आहे. डॉक्टर व त्यांचा इतर स्टाफ अविरतपणे प्रयत्न करत असतो. या योजनेमुळे अनेक नागरिकांना फायदा झाला. व त्यांनी भरभरून कौतुक केले. कारण मेडिकल हे क्षेत्र असे आहे की जिथे एक रुपयाही कमी केला जात नाही. परंतु स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त ही संधी नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्यामुळे सर्व स्तरातून याचे कौतुक करण्यात आले आहे. तर डॉक्टर पूजा मैड यांनी उपस्थित सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन त्यांचे आभार देखील मानले.